Home यवतमाळ पपिता ईसु माळवेंना एस एल फाउंडेशनचा श्रमसंस्कार पुरस्कार

पपिता ईसु माळवेंना एस एल फाउंडेशनचा श्रमसंस्कार पुरस्कार

216

दाते काँलेजात सिने रसिक मंचतर्फे संगीत संध्या…

यवतमाळ (प्रतिनिधी) : दाते काँलेजमधील १९९४ पासुन शिक्षारत असलेल्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या एस एल फाउंडेशनच्या मार्फत सक्रिय सामाजिक कार्यकर्त्याला श्रमसंस्कार पुरस्कार गत चार वर्षापासुन दिला जात आहे. यंदाचा पुरस्कार वाघाडी येथे आम्ही साऱ्या सावित्री हे मुलींचे वसतीगृह प्रतिकुल परिस्थितीत चालविणाऱ्या पारधी सखी पपिताताई ईसुभाऊ माळवे यांना जाहिर झाला आहे.
दाते काँलेजातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रविवारी ९ मार्च २०२५ ला सायंकाळी ४ वाजता होणार असलेल्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
फाउंडेशनमधील विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असलेले स्व. सु. ल. देशपांडे सरांच्या ५ व्या स्मृतीदिनानिमीत्त आणि महिला दिनाच्या औचित्याने यावेळेसचा ‘श्रमसंस्कार पुरस्कार २०२५’ हा सेवा पुरस्कार वितरित होणार आहे. यानिमीत्ताने यवतमाळातील सुप्रसिद्ध सिने रसिक मंच प्रस्तुत *सु ल स र ग म* विशेष संगीत संध्येचेही आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी स्व. गौरी संजय चकुले यांचे स्मृतीप्रित्यर्थ तिचे पालकांकडुन गरजु व होतकरु विद्यार्थीनीला वार्षिक शिष्यवृत्तीही प्रदान केली जाणार आहे.
उपप्राचार्य मा. डाँ. श्री. ताराचंद कठाळे सरांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाणिज्य ट्रस्टचे अध्यक्ष मा. श्री. विनायकराव दाते सर असणार आहेत. तसेच मुख्य अतिथी म्हणुन सिने रसिक मंचचे अध्यक्ष मा. श्री. यशवंत बापु पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
या सेवाभावी सोहळ्यास सामाजिक क्षेत्रातील विविध सेवाव्रतींची उपस्थिती असणार आहे.
या छोटेखानी कार्यक्रमास शिक्षण, सामाजिक, संगीत, पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांनी आवर्जुन उपस्थित राहण्याची विनंती आयोजकांमार्फत करण्यात आली आहे.