Home बुलडाणा जिजाऊच्या संस्कारातून वारकरी धर्म जिवंत आहे. ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील.

जिजाऊच्या संस्कारातून वारकरी धर्म जिवंत आहे. ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील.

242

 

आंतरराष्ट्रीय कथावाचक विवेकदास शास्त्री महाराजांची उपस्थिती.

वारकरी भूषण हभप तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्यासह संतांची मांदियाळी.

चिंचपूरात सात दिवसीय प्रबोधन,व्याख्यान, कथा -कीर्तनाचे आयोजन.

बुलढाणा /मोताळा
छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या संस्कारातूनच संस्कृती आणि वारकरी धर्माचे अधिष्ठान अबाधित जिवंतआहे. छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याची प्रक्रिया आई-वडिलांकडून, समाज प्रबोधनातून केल्या जाते. पालकांनी जिजाऊ लेकिनवर जिजाऊ चे संस्कार टाकले तर मुलगी दोन्ही कुळाचा उद्धार करते. त्यासाठी मुलींना प्रथम शिक्षण देऊन स्वयंभू करावे. तेव्हाच संस्काराची प्रक्रिया गतिमान होईल.असे मत शिवव्याख्याते ॲड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी व्यक्त केले.
रायरेश्वर मंदिर संस्थान, चिंचपूर ग्रामवासी तालुक्यातील वारकरी, टाळकरी,भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सात दिवसीय शिव कथा,कीर्तन,प्रवचन, व्याख्यान प्रबोधनाचे आयोजन 26 फेब्रुवारी 2025 ते 5 मार्च 2025 दरम्यान ग्राम चिंचपूर येथील रायरेश्वर संस्थांनच्या प्रांगणात करण्यात आले आहे. दरम्यान एक मार्चला दुपारी राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवराय या विषयावर शिवव्याख्याते ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपरोक्त मनोगत ऍड रोठेंनी व्यक्त केले.
यावेळी आंतरराष्ट्रीय शिवकथा वाचक युवाचार्य श्री विवेकदासजी शास्त्री महाराज, काशी, आयोजन समिती चे पुरुषोत्तम मापारी, हभप गोपाल महाराज कचोरे, हभप रमेश महाराज विधाते, हभप वसंत महाराज पोरज, हभप चांगदेव महाराज कुटे, हभप भास्कर महाराज पठाडे  धर्मपीठावर प्रामुख्याने उपस्थिती होती.
विधिवत कथा आणि शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली.
मनोगत व्यक्त करताना रोठे पुढे म्हणाले की बदलत्या काळानुसार संस्काराची प्रक्रिया ही बदलणे क्रमप्राप्त आहे.मुलींना शिक्षणासह स्वयंभू परिपूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे. तरच समाज प्रगतीपथावर जाईल. यासह आपल्या खास शैलीत ॲड रोठेनी वास्तविक जीवनातील उदाहरणांसह केलेल्या प्रबोधनातून समाजमनाच्या हृदयाचा ठाव घेतला. महिला व मुलींची लक्षणीय उपस्थिती व्याख्यानाचे विशेष आकर्षण ठरली.
दैनंदिन कीर्तन,प्रबोधन, शिवचरित्र सेवा अनुक्रमे विवेक सागर हभप संभाजी महाराज, मुक्ताई  कृपाळू हभप नितीन महाराज अहिर, शिवचरित्रकार सुनील महाराज रावेर, हभप अनिल महाराज वसाळीकर, शिवचरित्रकार हभप शिवाजी महाराज झांबरे, वेदांतचार्य हभप लक्ष्मण महाराज वाघोदे, हभप शिवदास महाराज राहणे,खेडी पानेरा, वारकरी संप्रदायाचे भूषण हभप तुकाराम महाराज सखारामपुरकर इलोरा यांच्या काल्याचे किर्तन आणि समाज प्रबोधनातून शिवकथा, प्रबोधन, किर्तन कार्यक्रमाची सांगता 5 मार्चला होणार आहे. समाज बांधवांनी बहुसंख्येने सामील होत कथा प्रवचन आणि व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण सात दिवसीय कथा, प्रवचन,कीर्तन, व्याख्यान, महाप्रसाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामचिंचपूर, रायरेश्वर संस्थान, डिडोळा खुर्द -बुद्रुक,  तालखेड, टाकरखेड, शेलापुर, पिंपळपाटी, तळणी, काबरखेड, वडगाव, अंत्रि, बोराखेडी, परडा, शिरवा, कोथळी, मोताळा,खरबडी,वरुड,शेंबा,
आडविहीर, महालपिंपरी, रिधोरा, पुन्हई,भोरटेक, वाघजाळ, सांगळद, राजुर, रोहिणखेड, थळ,काळेगाव यासह तालुक्यातील ग्रामस्थ, टाळकरी, गायनाचार्य, भजनी मंडळ अथक परिश्रम घेत आहे.