Home बुलडाणा मावशीच्या नवऱ्याची वाईट नजर तिच्यावर फिरली अन , विरीतच घडले ,???

मावशीच्या नवऱ्याची वाईट नजर तिच्यावर फिरली अन , विरीतच घडले ,???

122

 

अमीन शाह

बुलडाणा ,

घरात झोपेत असताना सख्या मावशीच्या नवऱ्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अशा मुलीच्या तक्रारी वरुण ३२ वर्षीय आरोपी मावसाला अंढेरा पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील घटनेची माहिती अशी की आरोपी मुलीचे मावसा मावशी हे गेल्या दोन दिवसा पासून गावी आले होते. रात्री सर्वांनी सोबत जेवण केले आणि घरामध्ये एकमेकाच्या शेजारी झोपले होते मात्र रात्री अंधाराचा गैरफायदा घेत मावसाने सालीची अल्पवयीन असलेली १२ वर्षाच्या मुली जवळ जावून तीचा बलात्कार केला. तेव्हा मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने घरात झोपलेले सर्व जण उठले असता आरोपी हा लगेच त्याच्या जागेवर जावून झोपला परंतु मुलीने मावासाने केलेल्या कृत्या बद्दल सर्व घटना सांगण्यास सुरवात केली. त्यामुळे लगेच मुलीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशनलां जावून तक्रार दाखल केली.

पोलिस स्टेशनला आलेली तक्रार व पीडित मुलीची हकीकत एकूण घेवून ठाणेदार विकास पाटील यांनी दुय्यम ठाणेदार जारवाल यांना तात्काळ आरोपी अटक करण्याचे आदेश दिले त्यामूळे दुय्यम ठाणेदार जारवाल यांनी आरोपी रामप्रसाद श्रावण अंभोरे वय ३२ वर्ष रा. चंदनझीरा जालना यांच्या विरूध्द कलम 65(1)64(2)(f)64(2)(i)74,BNS बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 4, 6,8,12 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अशा या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.