Home बुलडाणा मंदिराच्या घंटी ला गळफास लावून इसमाची आत्महत्या !

मंदिराच्या घंटी ला गळफास लावून इसमाची आत्महत्या !

105

 

 

अमीन शाह

बुलढाणा
शहरालगत असलेल्या सागवण येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका ३९ वर्षीय व्यक्तीने गावातील मंदिराच्या घंटीला कापड बांधून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली.

गजानन गुंजाळ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुंजाळ हे तालुक्याच्या अंबोडा गावचे रहिवासी असून शेतमजूर म्हणून काम करायचे. सागवान हे त्यांचे सासरचे घर होते बुधवारी ते पत्नीला भेटण्यासाठी सागवण येथे आले होते. इतक्यात रात्री काय झालं कुणास ठाऊक? सकाळी त्याचा मृतदेह सापडला. गुंजाळ यांनी अचानक आत्महत्या का केली? हे अजून समजले नाही गुंजाळ हा अतिशय सभ्य स्वभावाचा होता त्याला कोणतेही व्यसनही नसल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस अधिक तपास करत आहेत