
घाटंजी – बाबुळगाव पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष हेड मोहरर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून दुसऱ्यांदा गौरविण्यात आले.

बाभुळगाव पोलीस स्टेशन मध्ये नेमणुकीस असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रावण राठोड यांनी माहे एप्रिल २०२४ मध्ये पोलीस स्टेशन स्तरावर मुद्देमाल निर्गंती मोहिमेमध्ये भरीव व कौतुकास्पद कामगिरी केली आहे.ही कामगिरी यवतमाळ पोलीस विभागाकरिता अतिशय अभिमानास्पद बाब असल्याचे व त्यांची चिकाटी व जिद्द नक्कीच स्तुत्य असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बनसोड व अप्पर पोलीस अधीक्षक यांनी राठोड यांचे दुसऱ्यांदा प्रमाणपत्र देवून सन्मानीत केले आहे.सोबतच ठाणेदार हुड यांना सुद्धा सन्मानीत केले असून निश्चित बाबुळगाव पोलीस स्टेशनची मान उंचावली आहे. या सन्मानाने तालुक्यासह जिल्हाभरात कौतुक करून सर्वत्र स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












































