Home नागपूर वाहतूक पोलीस स्मार्ट बूथ फक्त देखाव्याकरिता आहे काय?

वाहतूक पोलीस स्मार्ट बूथ फक्त देखाव्याकरिता आहे काय?

241

उमेश सावळकर.

नागपूर – काही महिन्यांपासून आपल्याला नागपूरच्या चौकाचौकात वाहतूक पोलीस स्मार्ट बूथ लागलेले दिसून येतात. दिसायला अतिशय सुंदर असे छोटेसे बूथ लक्ष वेधून घेतात काचेचे बूथ आणि वर हवा खेळण्याकरिता जागा असे बूथ नागपुरात जवळपास प्रत्येक चौकात बसविलेले आहे. हे बूथ वाहतूक पोलिसांकरिता उन्ह वारा पाऊस यापासून संरक्षण होईल असे बनविले आहे. याकडे पाहिल्यावर वाहतूक पोलिसांच्या सोयीसाठी विचार झालेला दिसून येतो.

परंतु एव्हडा खर्च करून त्या बूथ चा उपयोग होत आहे कि नाही हे सुद्धा पाहणे क्रमप्राप्त आहे. तर आपणांस असे दिसून येत आहे कि हे बूथ अनेक महिन्यापासून चौकात लागलेले असून त्यांचा आतापर्यंत उपयोग करण्यात आलेला नाही. हे बूथ जसे उभारले त्याच परिस्थितीत बंद आहे. कोणत्याच बूथचा एकदाही उपयोग झालेला नाही. जर पोलिसांच्या सोयीसाठी बूथ लावल्या गेले तर त्यांचा उपयोग का होत नाही. जर उपयोगात घ्यायचेच नव्हते तर लावले कशासाठी असा सामान्य नागरिकांना प्रश्न नक्कीच पडतो. हे बूथ उभारण्याकरिता जनतेच्याच पैशाचा उपयोग होतो मग कारण नसतांना बूथ उभाराचेच नव्हते. उभारले तर त्यांचा वापर लवकरात लवकर सुरु करावा असे वाटते. काही बूथ समाजकंटकांनी दगड मारून त्याच्या काचा फोडल्याचे सुद्धा दिसून आले आहे. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खुद्द वाहतूक पोलिसच त्याचा उपयोग घेण्याकरिता उदासीन असल्याचे पाहणीत आढळले. बूथ मध्ये राहील तर बाकीच्या कामांना आळा बसतो. कारण हवालदार साहेब रस्त्याच्या कडेला उभे राहून दुचाकी, चारचाकी वाहनांना हात दाखवून त्यांच्याकडून वसुली करण्याचे काम चोखपणे बजावताना दिसतात. त्यामुळे त्यांना बुथचे काहीच सोयरसुतक नाही असे गृहीत धरून चालण्यास हरकत नाही. तरी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष वेधून वाहतूक पोलीस स्मार्ट बूथचा वापर लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश द्यावे अन्यथा समाजकंटक त्याचा मुतारीसाठी उपयोग करण्यास मागेपुढे पाहणार नाही.