Home विदर्भ प्रेम प्रकरणातून युवकाचा खून तर दोन आरोपी अटक , “सहा फरार”

प्रेम प्रकरणातून युवकाचा खून तर दोन आरोपी अटक , “सहा फरार”

242

अमीन शाह

बुलडाणा , दि. ०५ :- संग्रामपूर तालुक्यातील सावळा येथील एका तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने सहाय्याने खून केल्याची घटना मंगळवारी रात्री ८:३० वाजता घडली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. दरम्यान, या खुनामुळे तालुक्यात खळबळ झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर देवेंद्र घिवे (वय ३५, रा. सावळा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. हया युवकाचे मागील दोन वर्षपासून एका मुलीसोबत प्रेम संबंध असल्याने त्या कारनावावरून आठ जणांनी त्याचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये फिर्यादी देवेंद्र रामनाथ घिवे रा . सावळा याच्या फिर्यादीवरून आरोपी – 1 . प्रभाकर महादेव धुळ 2 . गजानन महादेव धुळ 3 . अजाबराव महादेव धूळ 4 . गणेश प्रभाकर धुळ 5 . प्रकाश गजानन धुळ 6 . रामराव अजाबराव धुळ 7 . विठ्ठल अजाबराव धुळ 8 . ज्ञानेश्वर मनोहर धुळ सर्व रा . सावळा ता संग्रामपुर आहे. हकीकत . अशा प्रकारे आहे . यातील मृतक ज्ञानेश्वर घिवे याचे आरोपी क्र . १ चे मुलीसोबत मागील दोन वर्षापासुण प्रेम संबंध होते . नमुद घतावेळी व ठिकाणी मृतक हा आरोपी क्र . १ च्या घरात घुसला या कारणावरुण आरोपी क्र . १ याने मृतक यास कु – हाडींचे लाकडी दांड्याने मारहाण केली व आरोपी क्र . २ ते ८ यांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन मृतक यास लाथ बुक्यांनी मारहाण केली . मृतक यास उपचाराकरीता सरकारी दवाखाना शेगांव येथे भरती केले असता तो मरण पावला या युवकाचा आठ जणांनी निर्घृण खून केला. यातील एकाच्या मुलींच्यासोबत ज्ञानेश्वर घिवे चे प्रेमसंबंध होते याच कारणावरून त्याला जिवे मारण्यात आले. लोखडी कुऱ्हाडी सहाय्याने मारहाण केली मृतक यास उपचारासाठी शेगांव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर यांनी मृतक घोषित केले. घटनेनंतर मुटकाचे वडील देवेंद्र रामनाथ घिवे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यानुसार वरील दोघांसह सात ते आठ जणांविरुद्ध भादवी.कलम ३०२,१४३,१४७,१४८,१४९ यानुसार गुन्हा दाखल करून दोन आरोपीना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत.

गणेश प्रभाकर धूळ व ज्ञानेश्वर प्रभाकर धूळ पोलीस ताब्यात आहे ६ फरार आहेत ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत विखे ,पो.हे.कॉ. शिवा कायदे , करत आहे .