Home यवतमाळ रेती माफियांचा यवतमाळ जिल्हात धुमाकुळ…!

रेती माफियांचा यवतमाळ जिल्हात धुमाकुळ…!

141

विनोद पत्रे 

तहसीलदार , मंडळ अधिकारी व उप विभागीय अधिकारी यांच्या मोबाइल डिटेल्स चेक करण्याची मागणी…!

यवतमाळ – एखाद्या अस्सल खजिनदाराला थाट बाट लावलेला हा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. चर्चा त्याच्या थाट बाटाची नसून चर्चा आहे कमकुवत असलेला रेती माफिया याची अवघ्या चार ते पाच वर्षामध्ये अनेक रेती माफिया ५० लाख रूपये च्या मालकीचा मालक झाला? सध्या यवतमाळ जिल्हात कौन बनेगा करोडपती ची स्पर्धा खेळली जात असून त्यांनी हा डाव रेती तस्करी मध्ये खेळला असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती आहे.
यवतमाळ जिल्हातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक रेती माफिया राजकारणात सक्रिय आहेत.यवतमाळ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रेती घाट गोळा करणे आणि त्यांना भरघोस उप्पनाची हमी देने हा त्यांचा महत्वपूर्ण विषय अधिकार्यांचा व राजकीय पाठबळामुळे सध्या बनलेला आहे.