Home यवतमाळ राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा अभ्यंकर कन्या शाळेला कास्यपदक…!

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा अभ्यंकर कन्या शाळेला कास्यपदक…!

137

यवतमाळ – नुकत्याच दिनांक 23 ते 27 नोव्हेंबर रोजी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या वतीने आयोजित शालेय राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा 17 वर्षे वयोगट पुणे येथे बालेवाडी क्रीडा संकुलनात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये अभ्यंकर कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींनी तृतीय स्थान प्राप्त केले या संघाला पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले यापूर्वी या संघाने नेहरू कप राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये कांस्यपदक प्राप्त केले होते औरंगाबाद विभागाचा एकतर्फी पराभव करत तृतीय स्थानासाठी झालेल्या अंतिम सामन्यात पुणे विभागाचा दोन एक असा पराभव करून या संघाने कास्यपदक प्राप्त केले या संघामध्ये डॉली मसराम समीक्षा वाघमारे गुंजन बाविस्कर किशोरी काठोळे खुशी सावकार प्रगती भांडेकर प्राची पानसरे खुशी महालकर वैष्णवी पंधरे गौरी दुरतकर गायत्री बागडकर फाल्गुनी पिल्लारे पूर्वा दुपारे डिंपल जाधव समृद्धी मांगुळकर शाश्वती मांगुळकर अनुष्का वा भिटकर काजल वाघमारे यांनी सहभाग घेतला या संघामधून प्राची पंनचोरे ची महाराष्ट्र हॉकी संघामध्ये राष्ट्रीय हॉकी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली वरील खेळाडू आपल्या यशाचे श्रेय वुमन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ए पी दर्डा सचिव रमेश मुनोत मुख्याध्यापिका मोहना गंगम वार उपमुख्याध्यापक अविनाश जोशी प्रशिक्षक शाहीद सय्यद गौरव निंबोळकर रूपाली तिरपुडे व संजय बट्टा वार यांना देतात