Home यवतमाळ केंद्रीय मंत्रालयाद्वारे ‘NDPS Act’ च्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन व अन्न व औषध...

केंद्रीय मंत्रालयाद्वारे ‘NDPS Act’ च्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त बैठक

156

 यवतमाळ – स्थानिक केमिस्ट भवन मध्ये शहरातील सर्व केमिस्टांसाठी पोलीस प्रशासना तर्फे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप साहेब तर अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री. मिलिंद काळेश्वरकर साहेब यांच्या संयुक्त बैठकीत ,केंद्र सरकारसाठी अत्यंत संवेदनशील असणाऱ्या”NDPS Act” म्हणजेच Narcotics drug & Psychotropic Substances Act अंतर्गत येणाऱ्या औषधांची विक्री व त्यांचा मिस युज कशाप्रकारे समाजामध्ये होऊ शकतो, या संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

दिवसेंदिवस तरुणांमध्ये त्याचा विशेष प्रभाव पडून, ते नशेच्या आहारी जाऊन विविध प्रकारचे संगीत गुन्हे जसे की लूटमार, हत्या करीत आहेत. म्हणूनच एकंदरीत फार्मासिस्टनची जबाबदारी यामध्ये वाढलेली आहे. त्यांनी याचे भान ठेवून योग्य डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ही औषधे विक्री करू नयेत व विकलेल्या औषधांची योग्य रीतीने नोंद ठेवणे बंधनकारक आहे असे नमूद केले.NDPS कायद्याचे उल्लंघन झाल्यास केंद्र सरकारकडून सक्त कारवाईचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप साहेबांनी सांगितले.NDPS कायद्यामध्ये नेमकी कुठली औषधी आहेत, त्याचा मिस युज कशा प्रकारे होऊ शकतो, ही औषधी विकताना कुठली काळजी घ्यायची याबद्दलची सविस्तर माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री. मिलिंद काळेश्वरकर साहेब यांनी दिली. मंचावर अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप साहेब, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री मिलिंद काळेश्वरकर साहेब, नुकतेच MSCDA च्या सदस्य पदी निवड झालेल्या श्री. संजय पिंपळखुटे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.प्रसंगी AIOCDA चे सदस्य श्री रमणजी अग्रवाल,औषधी निरीक्षक सौ. सविता दातीर मॅडम,जिल्हा अध्यक्ष श्री. पंकज नानवाणी, सचिव संजय बुरले, कोषाध्यक्ष गजानन बट्टावार, शहर अध्यक्ष श्रीकांत खडककर, सचिव प्रसाद चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव प्रसाद चौधरी यांनी, तर प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष श्री. पंकज नानवाणी यांनी करून जिल्ह्यातील सर्व केमिस्टांची हमी घेतली व असे कुठलेही प्रकार आपल्या सदस्यांकडून भविष्यात होणार नाही याची ग्वाही दिली. अशा प्रकारची शासनासोबत केमिस्ट बांधवांची कार्यशाळा प्रथमच संपूर्ण राज्यात यवतमाळ जिल्ह्यात घेतल्याबद्दल शासकीय अधिकाऱ्यांचे संघटनेतर्फे आभार मानण्यात आले. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी श्री. अविनाश फरकुंडे यांनी कळविली.