Home यवतमाळ ताडसावळी येथे महसुल विभागाने अवैध रेतीचा ट्रक्टर पकडला; सदर ट्रक्टर पुढील कारवाईसाठी...

ताडसावळी येथे महसुल विभागाने अवैध रेतीचा ट्रक्टर पकडला; सदर ट्रक्टर पुढील कारवाईसाठी पारवा पोलीसांच्या ताब्यात…!

131

➡️ घाटंजी येथील महसुल विभागाच्या पथकाची अवैध रेतीच्या ट्रक्टर वर कारवाई..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी, 4 ऑक्टोबर :- घाटंजी तहसील कार्यालयात तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय साळवे व परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिश शेलवटकर हे जेव्हा पासून घाटंजी तहसील कार्यालयात रुजु झाले. तेव्हा पासून घाटंजीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विजय साळवे, परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांच्या पथकाने अनेक अवैध रेतीचे ट्रक व ट्रक्टर जप्त करुन पुढील कारवाईसाठी घाटंजी पोलीस स्टेशन व पारवा पोलीस स्टेशनला लावण्यात आल्याने घाटंजी तालुक्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी रात्री 11 वाजता घाटंजी तहसीलचे परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांच्या पथकाने ताडसावळी येथील बेघर वस्तीजवळ अवैध रेतीचा ढिगारा होता, अशी गोपनीय माहिती महसुल विभागाला प्राप्त झाली. त्यामुळे परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनिष शेलवटकर हे आपल्या पथकासह ताडसावळी येथे धाड टाकण्यासाठी गेले असता, अपर तहसीलदार शेलवटकर हे येण्यापुर्वी ट्रक्टरमध्ये रेती भरुन सायंकाळी ट्रक्टर नेणार होते. मात्र त्या पुर्वीच ट्रक्टर चालक व ट्रक्टर वरिल मजुर पसार झाले. त्यामुळे अवैध रेतीचा ट्रक्टर आरोपी विना पकडण्यात आला. मात्र, सद्यातरी संशयीत आरोपींचा शोध लागलेला नाही. सदर ट्रक्टर पुढील कारवाईसाठी पारवा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर कारवाई घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार तथा कार्यकारी अधिकारी विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन तहसीलदार तथा अपर तहसीलदार मोहनीष शेलवटकर, तलाठी रामेश्वर कुमरे, तलाठी आर.जी राठोड, कोतवाल ईस्तारी आपतवार आदींच्या उपस्थितीत सदरची कारवाई करण्यात आली.