Home यवतमाळ जनतेने पुन्हा अनुभवले उंबरकरांचे दायित्व, अपघातग्रस्ताला मोठी मदत

जनतेने पुन्हा अनुभवले उंबरकरांचे दायित्व, अपघातग्रस्ताला मोठी मदत

125

यवतमाळ/ प्रतिनिधी

वणी शहरालगत असलेल्या चिखलगावातील प्रज्वल रणजित शेंडे ( वय १९) या युवकाचा दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी मजूरी करीता जात असताना. गाडी दुभाजकावर गेल्याने त्याचा अपघात झाला होता. झालेल्या अपघातात प्रज्वलच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागला. त्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात प्रज्वलच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. दुखापत आणि जखमा एवढ्या गंभीर स्वरूपच्या होत्या की, यामुळे प्रज्वला कायमस्वरूपी अपंगत्व आणि मेंदू निकामी होण्याचा अंदाज येथील डॉक्टरांनी व्यक्त केला होता. त्यामुळे यावर तात्काळ उपचारासाठी मोठया व तज्ञ डॉक्टरांकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला. परंतु कुटुंबाचीच परिस्थिती बेताची असल्याने प्रज्वल वर मोठ्या नामांकित दवाखान्यात उपचार करणे शक्य नसल्याने कुटुंब या परिस्थितीत हताश आणि हतबल झाले. दोन वेळच्या जेवणाचा आणि प्रज्वलच्या रोजच्या औषधांचा खर्च भागविण्यासाठी कुटुंबीयांची कसरत सुरु झाली.
आपला हा मुलगा पुन्हा एकदा जशास तसा बरा होऊन ठणठणीत चालावा यासाठी प्रयत्नांच्या पराकाष्टा सुरू केल्या दरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते नेते मंडळी आणि दानशुराना कडे जाऊन आपल्या पदरात प्रज्वलच्या उपचाराची भीक मागितली. परंतू या मातेच्या दुःखावर फुंकर घालण्यास कोणीही समोर आला नाहीं. विभागाच्या बहुतांश राजकिय मंडळींनी कित्येक काळ आपले उंबरठे झिजवण्यास या कुटुंबीयाना भाग पाडले. कुटुंबियांच्या पदरी शेवटी निराशाच पडली. दरम्यान हे दुःख एका महिलेला सांगत असताना, त्या महिलेने मदतीसाठी राजुभाऊ उंबरकर यांच्याकडे जा असा सल्ला दिला. या दुःखात ते तुमच्या सोबत राहुन सर्व मदत करतील असा सल्ला तिने दिला. उंबरकरांच नाव ऐकताच या कुटुंबीयांना एक आशेचा किरण दिसला.आणि तात्काळ या कुटुंबीयांनी उंबरकरांच कार्यालय गाठल. त्यांना भेटून आपली सगळी परिस्थिती कथन केली.
मनसे नेते राजु उंबरकर यांनी क्षणाचा ही विलंब न करता. ताबडतोब रुग्णवाहिका शेंडे यांच्या घरी पाठविली. आणि प्रज्वलला नागपुर येथिल नामांकित दवाखान्यात दाखल केले. तुमचा मुलगा पहिल्यासारखा ठणठणीत बरा होईल तो पुन्हा हसत खेळत आपलं आयुष्य जगू शकेल याची पूर्ण जबाबदारी माझी असेल तुम्ही निश्चिंत रहा. मी तुमच्या मुलासारखाच आहे. असे उदगार उंबरकरानी काढले. त्यांचा हा विश्वास आणि आधार त्यामातेच्या हृदयावर ठाव घेणाराच होता. हे वाक्य ऐकताच त्या मातेच्या डोळ्याला आनंद अश्रूच्या धारा लागल्या. आपल्या भावी आयुष्याचा आधार राजुभाऊंनी पुन्हा जशाच तसा मिळवून देईल. आमच्यावर कोसळलेल हे दुःख स्वतःच्या खांद्यावर घेतल याचे आभार शब्द नाही तर कुटुंबीयांचे अश्रू व्यक्त करत होते.

नागपुर येथिल नामांकित दवाखान्यात प्रज्वलला दाखल केल्या नंतर सतत पंधरा दिवस त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याचबरोबर महागड्या औषध, इंजेक्शन देऊन त्याच्या डोक्यावर आणि इतर अवयवांवर लागलेला मार आणि जखमा भरून काढण्यात आल्या. सतत पंधरा दिवस झालेल्या उपचारामुळे प्रज्वल पूर्णपणें बरा झाला. जातांना झोपून गेलेला प्रज्वल येताना स्वतःच्या पायावर घरी चालत आला. कायमस्वरूपी आलेलं अपंगत्व यांच्या दानत्वातून नाहीस झालं आणि प्रज्वल पुन्हा ठणठणीत बरा झाला. गरजवंताना उंबरकर नेहमीं मदत करत असतात. त्यांच्या या कार्यातून प्रज्वलसारख्या अनेकांना जीवनदान मिळाले असून, प्रज्वलच्या या उपचाराने उंबरकर यांच्या सामाजिक कार्यात अजून एक भर पडली. त्यामुळे पुन्हा एकदा उंबरकर यांचे सामाजिक दायित्व जनतेने अनुभवलं.

 

 

…….कोट…….

प्रज्वलचा अचानक झालेला अपघात आमच्या कुटुंबावरच खुप मोठ संकट होत. धडधाकड मुलगा या अपघातामुळे अंथरुणात पडला होता त्याचा मेंदूही निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. प्रज्वल वर चांगले उपचार होऊन तो जशास तसा बरा व्हावा यासाठी मी आणि माझे पती सर्व राजकीय नेत्यांकडे आणि दानशूर व्यक्तींकडे गेलो होतो. परंतु आम्हाला यात कोणीही मदत केली नाही. शेवटी एका महिलेने राजुभाऊंकडे जा तुमची मदत नक्की करतील. असा सल्ला दिला आणि आम्ही लगेच भाऊंकडे गेलो त्यांना सर्व बाब सांगितल्यानंतर त्यांनी प्रज्वला ताबडतोब नागपूर येथे ऍडमिट केले. तेथील डॉक्टरांशी स्वतः भेटून त्याच्यावर चांगल्यात चांगले उपचार करा सर्व खर्च मी स्वतः करेल, असे सांगितले. राजूभाऊंच्या या मदतीमुळे आज आमचा मुलगा पुन्हा जशास तसा झाला. या संकटात भाऊ आमच्यासाठी एक माणूस म्हणुन नाही तर देव म्हणून धावले. माणसात देवच नाही पाहिला तर तो अनुभवला सुद्धा, भाऊंचे हे उपकार आम्ही आयुष्यभर ही विसरणार नाही.अशी प्रतिक्रीया प्रज्वलच्या आईने व्यक्त केली.