Home यवतमाळ घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकुण 365...

घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत मध्ये एकुण 365 प्रकरणे निकाली; वकील व पक्षकारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद..!

155
➡️ घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————
घाटंजी, 16 सप्टेंबर :- मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली, तसेच मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मा. उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशावरुन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन दिप प्रज्वलन तसेच झाडाला पाणी देउन घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी घाटंजी तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, सचिव ॲड. सादीक खान तसेच घाटंजी न्यायालयातील वकील, कर्मचारी, पक्षकार व इतर मंडळी उपस्थित होते.
या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायालयात प्रलंबित व वादपुर्ण प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्याच बरोबर वेगवेगळ्या राष्ट्रीय कृत बॅका व विशेष म्हणून जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत कराबाबतची वादपुर्ण प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालत समोर ठेवण्यात आली. सदर प्रकरणे मोठ्या संख्येने आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी घाटंजी तालुका विधि सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात, शासकीय अधिकारी, वकील, पक्षकार, विविध संस्थेतील व राष्ट्रीय कृत बॅकेतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलाविण्यात आले व त्यांना राष्ट्रीय लोक अदालतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.
घाटंजी येथील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकारांनी स्वेच्छेने व सामंजस्याने वाद अंतिम रित्या मिटविण्याची खात्री पटल्यामुळे घाटंजी येथील न्यायालयातील प्रकरणे तसेच वादपुर्ण प्रकरणे असे एकुण 365 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. निकाली निघालेल्या प्रकरणाची एकुण तडजोड मुल्य रुपये 94 लाख 94 हजार 182 रुपये एवढी होती.
एकंदरीत घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अनेक प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आल्याने वकील व पक्षकारांनी समाधान व्यक्त केले आहे.