
यवतमाळ – महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने आदर्श शिक्षक ,आदर्श मुख्याध्यापक व आदर्श शाळा पुरस्कार राज्याध्यक्ष मा. अर्जुन कोळी यांनी जाहीर केले. सदर राज्य पुरस्कार मा. मुख्यमंत्री , मा. उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री व मा. आयुक्त मा. खासदार ह्यांचे हस्ते पुरस्कार दिनांक – 8 आक्टोंबर 2023 रोजी पनवेल येथे सत्कार करण्यात येणार आहे.

यामध्ये नगरपरिषद यवतमाळ येथील आदर्श शिक्षक पुरस्कार- संजय चुनारकर न.प. शाळा क्र 8 पिंपळगाव यवतमाळ
आदर्श शिक्षक पुरस्कार- रेखा वरखडे न.प. शाळा क्र.6 अंबिकानगर यवतमाळ
आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार – सौ. करुणा बळी खैरे न.प. शाळा क्र.6 अंबिकानगर यवतमाळ तर आदर्श शाळा पुरस्कार- सौ.ज्योती सावळकर मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद डिजीटल ग्रीन पार्क स्कुल न.प. शाळा क्र. 18 गेडामनगर यवतमाळ ह्यांना आज महाराष्ट्रात राज्य नगरपालीका व महानगरपालीका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य ह्यांचे तर्फे जाहीर करण्यात आला.

पुरस्काराकरिता यवतमाळ नगरपालिकेतील शिक्षकांची निवड झाल्याबद्दल मुख्याधिकारी मा. दादाराव डोल्हारकर साहेब व प्रशासन अधिकारी निता गावंडे मॅडम यांनी अभिनंदन केले आहे













































