Home यवतमाळ झटाळा येथील सरपंच रेखाताई मेश्राम हिचा अपर जिल्हाधिकारी न्यायालयात दाखल विवाद अर्ज...

झटाळा येथील सरपंच रेखाताई मेश्राम हिचा अपर जिल्हाधिकारी न्यायालयात दाखल विवाद अर्ज मंजूर..!

163

➡️ अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या आदेशानुसार झटाळा येथील सरपंच रेखाताई मेश्राम पदावर कायम!

(अयनुद्दीन सोलंकी)
———————————
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील झटाळा ग्रामपंचायतच्या सरपंच रेखा निलेश मेश्राम यांचे विरुद्ध उपसरपंच रविंद्र मसराम सह ईतर ग्रामपंचायत सदस्यांनी 0 विरुद्ध 8 मतांनी अविश्वास प्रस्ताव परिविक्षाधीन तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांच्या कडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानंतर झटाळा येथे सरपंचासह इतरांना नोटीस बजावण्यात आली.

अध्यासी अधिकारी तथा परिविक्षाधीन तहसीलदार मोहनिश शेलवटकर यांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यात 0 विरुद्ध 8 मतांनी अविश्वास ठराव पारित झाला होता. दरम्यान, झटाळा ग्रामपंचायत चे सचिव व इतरांनी 7 कोटी 30 लाख रुपयाचा गैरप्रकार केल्याची लेखी तक्रार सरपंच रेखाताई मेश्राम हिने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे कडे करुन सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, सदर प्रकरणाची अद्यापही चौकशी करण्यात आलेली नाही.

अविश्वास प्रस्तावाविरुद्ध सरपंच रेखाताई मेश्राम हिने अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी 17 ऑगस्ट रोजी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयात होऊन त्यात सरपंच रेखाताई निलेश मेश्राम हिचे अपील मंजुर करण्यात आले. या वेळी अविश्वास ठराव रद्द करुन अर्जदार सरपंच यांचा विवाद अर्ज अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे सरपंच रेखाताई निलेश मेश्राम ह्या सरपंच पदावर कायम राहिल्या आहे. या निकालामुळे विरोधी गटाले चपराक बसली आहे.

अपील कर्त्या सरपंच रेखाताई मेश्रामहिचे तर्फे तत्कालीन जिल्हा सरकारी वकील तथा ॲड. अमरचंद दर्डा यांनी काम पाहिले. तर ॲड. पद्माकर मलुंडे यांनी त्यांना सहकार्य केले.