Home यवतमाळ घाटंजी; घाटी येथे धनादेश अनादर प्रकरणी आरोपी उत्तम राठोड याची घाटंजी न्यायालयाकडुन...

घाटंजी; घाटी येथे धनादेश अनादर प्रकरणी आरोपी उत्तम राठोड याची घाटंजी न्यायालयाकडुन निर्दोष मुक्तता..!

178
➡️ घाटंजी येथील पिठासीन अधिकारी तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांचे आदेश.
( अयनुद्दीन सोलंकी )
________________
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील घाटी (ता. घाटंजी) येथील आरोपी उत्तम बदुजी राठोड याची संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक 141/2018 प्रकरणात धनादेश अनादर प्रकरणी घाटंजीचे पिठासीन अधिकारी तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
सदर प्रकरणात फिर्यादी घाटंजी येथील ग्यानदीप ट्रेडर्सच्या संचालिका तसेच घाटंजी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष जगदीश पंजाबी यांच्या पत्नी सौ. जया जगदीश पंजाबी असुन आरोपी घाटी येथील उत्तम बदुजी राठोड हे होते.
आरोपी उत्तम राठोडतर्फे ॲड. अनंतकुमार पांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. तर फिर्यादी सौ. जया जगदीश पंजाबी तर्फे ॲड. गणेश धात्रक व ॲड. निलेश शुक्ला यांनी काम पाहिले.
फिर्यादी ग्यानदीप ट्रेडर्सच्या संचालिका सौ. जया जगदीश पंजाबी यांच्या मालकीचे संत मारोती महाराज आठवडी बाजारात ग्यानदीप ट्रेडर्स म्हणुन दुकान होते. सदरचे दुकान फिर्यादीचे पती माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी व मुलगा गौरव पंजाबी व नौकराच्या सहाय्याने चालवत होते. आरोपी उत्तम राठोड हे माजी नगराध्यक्ष जगदिश पंजाबी यांच्या जवळचे होते. तसेच त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. आरोपी उत्तम बदुजी राठोड याने घराचे बांधकाम करण्यासाठी ग्यानदीप ट्रेडर्स मधुन सिंमेट, गज इत्यादी उधारीवर घेतले होते. व 15 दिवसांत पैसे जमा करतो अशी खात्री दिली होती. त्यामुळे आरोपी कडे 1 लाख 82 हजार 480 रुपये थकीत झाले. सदर रक्कम परतफेडी करिता आरोपी उत्तम राठोड याने घाटंजी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅक घाटंजी शाखेचा धनादेश क्रमांक 367065 ₹ 1,82,480 चा धनादेश दिला. सदर धनादेश वटविण्यासाठी बॅकेत जमा केला असता, तो धनादेश अनादरीत होऊन निधी कमी आहे, या कारणास्तव बॅंकेतुन परत आला.
आरोपी उत्तम राठोड यांस पुन्हा थकीत रक्कमेची मागणी केली असता, आरोपीने पुन्हा दि. 16 डिसेंबर 2017 व 19 डिसेंबर 2017 रोजी धनादेश दिला. तो धनादेश पुन्हा भारतीय स्टेट बँक शाखा घाटंजी येथुन अनादरीत होऊन परत आला.
तदनंतर, फिर्यादीचे वकील ॲड. गणेश धात्रक यांचे मार्फत घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांचे न्यायालयात निगनिगेशिएबल INSTRUMENT ॲक्ट 138 अंतर्गत खटला दाखल केला. सदर प्रकरणात फिर्यादीचा मुलगा गौरव पंजाबी यास सौ. जया जगदीश पंजाबी हिने मुखत्यारपत्र करुन दिले होते.
विशेष म्हणजे सदर प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालय व मा. उच्च न्यायालय आदींचे न्यायनिवाडे यांचे अवलोकन करून विद्यमान न्यायालयाने आरोपी उत्तम बदुजी राठोड यांची पराक्रम्य लेख अधिनियम 1981 चे कलम 138 प्रमाणे अंतर्भुत वर्णिलेल्या अपराधासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 255 (1) मधील प्रावधानित तरतुदीनुसार सबळ पुराव्याअभावी घाटंजी येथील पिठासीन अधिकारी तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी मुक्त केले आहे.
आरोपी उत्तम राठोड यांची बाजू ज्येष्ठ वकील ॲड. अनंतकुमार पांडे यांनी घाटंजी न्यायालयात मांडली. तर फिर्यादी पक्षाची बाजू ॲड. गणेश धात्रक व ॲड. निलेश शुक्ला यांनी मांडली.