Home यवतमाळ यवतमाळ शहराला डोकेदुखी ठरत असलेले मुख्याधिकारी व माजीप्र याच्यातील वाद निस्तरावा!. याकरिता...

यवतमाळ शहराला डोकेदुखी ठरत असलेले मुख्याधिकारी व माजीप्र याच्यातील वाद निस्तरावा!. याकरिता मा. जिल्हाधिकाऱ्यांना सर्व सेवाभावी सामाजिक संस्था व कार्यकर्त्या तर्फे साकडे…!

143
यवतमाळ – जलसंवर्धन ही काळाची गरज असून याकरिता शासन प्रशासन प्रयत्नशील असते.वरील विषयाचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्यात आले. या संदर्भात सर्व सेवाभावी समाजसेवी संस्था व यवतमाळकर नागरिक यांचे स्वाक्षरी अभियान घेऊन मा. पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. तरी मूळ समस्या जिथच्या तिथे दिसते.

सध्या स्थितीत यवतमाळ शहरात विविध ठिकाणी पाईपलाईन फुटून लिकेजेस मधून चार चार महिने प्रक्रिया झालेल्या पाण्याचा अपव्यय नालीत होताना दिसतो. संबंधित विषयासाठी मजिप्रा कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क केला असता रस्त्यावरील लिकेजेस दुरुस्त करण्याकरिता खड्डे करावे लागतात मात्र यासाठी नगर परिषद यवतमाळचे मुख्याधिकारी परवानगी देत नाहीत व पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवतात. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांना लिकेज दुरुस्त करण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागतो आहे तसेच नागरिकांचा रोष पत्करावा लागतो .
या निर्माण झालेल्या वादामुळे शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रक्रिया झालेल्या पाण्याचा अपव्यय/ नासाडी सुरू आहे.
संबंधित विषयाची दखल घेऊन राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी पुढाकार घेऊन नगरपरिषद यवतमाळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात समन्वय घडून आणावा करिता राहुल दाभाडकर,संकेत लांबट( निस्वार्थ सेवा फाऊंडेशन) अनिकेत नवरे( निस्वार्थ सेवा फाऊंडेशन), किशोर बाभुळकर(निस्वार्थ सेवा फाऊंडेशन), अमोल व्होरा (Be -kind पशुमित्र ), अभिजीत गुल्हाने (Be -kind पशुमित्र ), दत्ता भाऊ कुळकर्णी,अनिल तांबेकर (संकल्प फाउंडेशन), विजय बुंदेला, दिनेश तिवाडे( जाणीव फाउंडेशन ), अमोल फुंदे (धैर्य फाउंडेशन), कमलेश बघेल (धैर्य फाउंडेशन) यांच्या हस्ते निवेदन देऊन माध्यस्थी करण्या करिता विनंती करण्यात आली.