Home यवतमाळ हिवरा परिसराला ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाचा तडाखा

हिवरा परिसराला ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाचा तडाखा

124

(अनेक वस्त्यांनाअनेक वस्त्यांना पाण्याचा वेढा, प्रशासनासह आजीमाजी लप्रतिनिधी ऑन फिल वेढा, प्रशासनासह आजीमाजी लोकप्रतिनिधमहागाव / हरिश कामारकर

राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होत आहे. जिकडे तिकडे पाऊसच पाऊस पडत आहे. जिल्ह्यात मुसळधार गेल्या दोन दिवसापासून मुसळधार व ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला असून नागरिकांची अक्षरश: ताराबंळ उडाल्याचे चित्र आहे. महागाव शहरासह तालुक्यात जोरदार पावसामुळे रस्ते जलमय झाले, अनेक घरात पावसाचे पाणी घुसले असून अनेक जीवनावश्यक वस्तू व साहित्याची नासाडी झाली आहे.
पावसाळ्याच्या सुरवातीला जून महिन्यात असमाधानकारक पाऊस झाल्याने हा बॅकलॉग भरत काढत जुलैच्या मध्यांनात राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या २- ३ दिवसापासून चालू असलेल्या सततधार पावसामुळे नदी – नाले ओसांडून वाहत आहे तर तालुक्यांतील पुस व पैनगंगा नदीला आज दिनांक (२२ जुलै) रोजी सकाळी मोठया प्रमाणात पूर आला. या पूर परिस्थीती मुळे नदी काठील अनेक गावांचा संपर्क तुटला तर जनजीवन विस्कळित झाले आहे. यात महागाव तालुक्यांतील आनंदनगर, थार, कवठा, वाकान, दहिसावळी या गावांना पाण्याने वेढा घातल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी घुसल्याने रहिवाश्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले तर या भागातील हजारो हेक्टर जमीन अजुनही पाण्याखाली असल्याने कापूस, सोयाबीन, तुर, मूग, हळद इत्यादी पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानाची प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत जाहिर करावी अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.

***चौकट***
आजी माजी लोकप्रतिनिधी सह प्रशासन ऑनफिल्ड..

गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने चांगलाच जोर धरला असुन तालुक्यांतील सर्वच नदी नाल्यांना पूर आला. यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले. तर अनेक गावांचा संपर्क तुटल्याने बरेच लोक पाण्यात अडकलेले होते. ही वार्ता सर्वत्रच पसरतात तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, महसूल प्रशासन तसेच विभागाचे माजी आमदार राजेंद्र नजरधने हे या भागातील लोकांच्या संपर्कात असून अनेक ठिकाणीं प्रत्यक्षात मदत कार्यात सहभागी झाले तर हिवरा सर्कलचे मा. जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील व जिल्हा बँकेचे संचालक शिवाजीराव राठोड यांनी परिस्थितीचा आढावा घेत राज्याच्या मुख्य सचिवांना निवेदन पाठवून याभागात प्रशासनाचे मदतकार्य मोहिम वाढवावी व नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाव्दारे केली.

******चौकट*****
जिल्हा प्रशासनाकडून रेड अलर्ट जारी, सतर्कतेचा इशारा
गुरुवार पासुन चालू झालेल्या पावसाने जिल्ह्यांत नॉन स्टॉप बॅटिंग केल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर नदिकाठील गावांना सतर्कतेचा इशारा बजाविण्यात आला आहे. तर हवामान खात्याने वर्तविलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. जिल्हयातील शाळांना शनिवारी सार्वजनिक सुटी जाहिर करण्यात आली. तर पुढील काही काळ सावधान राहण्याच्या सूचना या द्वारे जिल्हावासियांना देण्यात आल्या.