
शहरात चर्चेला एकच उधाण घटनास्थळी लोकांची एकच गर्दी ,
अमीन शाह
चिखली( बुलडाणा ) स्थानिक चिंच परिसरा जवळ बांधकाम सुरू असताना जेसीबीच्या साहाय्याने कॉलम चे गड्डे खोदताना ब्रिटीशकालीन चांदीचे नाणे जमिनीत गाडलेले आढळून आले. हे ठिकाण मुख्य रस्त्यालगत असल्याने नागरिकांनी येथे एकच मोठी गर्दी केली होती. जागेचा मालक येण्यापूर्वीच काही लोकांनी नाणी पळवून नेण्यात यश आल्याचे ऐकायला मिळत असून पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 18 जुलै 2023 रोजी स्थानिक प्रभाग क्र. 14 मध्ये नवनीत स्टोअर्सचे मालक प्रमोद रुपारेलिया यांनी 20 वर्षांपूर्वी ताब्यात घेतलेल्या जागेचे बांधकाम सुरू केले.त्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डा बुजविण्याचे काम आज सुरू करण्यात आले. दरम्यान, जेसीबीच्या फावड्यात फाटलेली कापडी पिशवी अडकून त्यातून काही नाणी पडत असल्याचे काही जणांनी पाहिले. काही क्षणांतच ही वार्ता परिसरात पसरली अन , येथे लोकांची एकच गर्दी झाली याची माहिती जागा मालकांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. ही बातमी परिसरात वार्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली, रुपारेलिया यांनी खड्डा बुजवून काम बंद पाडले. सापडलेले चांदीचे नाणे हे काही पुरातन नाण्यांसोबत 1913 चे ब्रिटिशकालीन एक रुपयाचे नाणे आहे.
खड्ड्यात माती टाकत असताना आणखी काही नाणी सापडली. रुपारेलियाकडे यातील ३ नाणी असून त्यापैकी एक नाणी तपासासाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली
असल्याची माहिती प्राप्त झाली आहे
सध्या शहरात सापडलेल्या नाण्याची एकच चर्चा केली जात आहे ,











































