Home पालघर आदिवासी बेरोजगार अभियोग्यता धारक डी. एड, बी.एड अभियोग्यता धारकांचा विधाभावनावर लॉंग मार्च.

आदिवासी बेरोजगार अभियोग्यता धारक डी. एड, बी.एड अभियोग्यता धारकांचा विधाभावनावर लॉंग मार्च.

123

जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी.

पालघर शिक्षक भरती साठी गेल्या तीन वर्षांपासून आदिवासी डी. टी. एड, बी. एड कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन केली जातं आहेत.फेब्रुवारी २०२३ मध्ये पवित्र पोर्टल च्या माध्यमातून शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयोजीत करण्यात आली. सदर परीक्षेचा निकाल लागून पाच महिने व्हायला आले परंतु अद्याप पवित्र पोर्टल चालू करण्यात आले नाही.
शालेय शिक्षण मंत्री यांनी नुकतीच ५० हजार शिक्षक भरण्याची घोषणा केली आहे.त्यात दोन टप्पे करून पहिल्या टप्यात ३० हजार पदे भरण्यास सरकार अनुकूल आहे.परंतु मंत्री हे नुसते घोषणा करत असून आता पर्यंत त्यांनी घोषणे पलीकडे पवित्र पोर्टल सुरु करण्यासाठी कोणतेही आदेश आयुक्त सूरज मांढरे यांना दिलेले नाही. त्यामुळे शासन आणि प्रशासन यात ताळमेळ दिसत नसून मंत्र्याच्या घोषनेला अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत असा गंभीर आरोप समितीचे राज्यध्यक्ष दामू मौळे यांनी केला आहे.
२४ जुलै २०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर ते विधानभवन मुंबई येथे पायी लॉंग मार्चचे आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत नुकतेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांना लॉंग मार्च बाबत निवेदन देण्यात आले आहे.
पवित्र पोर्टल तात्काळ सुरु करणे, अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त जागा एकच टप्यात (पहिल्या) ८०% भरण्यात याव्यात, अनुसूचित जमाती विशेष पद भरती मधील रिक्त राहिलेल्या जागा भरणे, निवृत्त शिक्षकांना कंत्राटी न घेता त्या ठिकाणी कायम शिक्षक भरती करणे अशा मागण्यासाठी आदिवासी बेरोजगार अभियोग्यता धारक लॉंग मार्च मध्ये सामील होणार आहेत.

कोट-

शासन नुसतं घोषणा करत आहे. पण भरतीला अद्याप मुहूर्त मिळाला नाही. तात्काळ भरतीची प्रक्रिया सुरु करावी व आम्हाला न्याय द्यावा. आज बऱ्याच शाळावर शिक्षक नाहीत.त्यामुळे हा लॉंग मार्च आम्ही काढतोय.

-राजउपाध्यक्ष, रुपाली मेघा.