Home यवतमाळ घाटंजीच्या तत्कालीन तहसीलदार पुजा माटोडे यांची मुंबई येथील अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक...

घाटंजीच्या तत्कालीन तहसीलदार पुजा माटोडे यांची मुंबई येथील अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे चौकशी सुरू..!

218

➡️ सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी याशनी नागराजन यांचे 7 दिवसांत अहवाल दाखल करण्याचे तहसीलदार घाटंजी यांना आदेश..!

  • ( अयनुद्दीन सोलंकी )
    ————————-
    घाटंजी : घाटंजीच्या तत्कालीन तहसीलदार पुजा माटोडे यांची मुंबई येथील अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार ई मेल द्वारे करण्यात आली असून सदर प्रकरणात 7 दिवसांच्या आंत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल दाखल करण्याचे आदेश सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी पांढरकवडा याशनी नागराजन यांनी घाटंजीचे तहसीलदार गोपाल देशपांडे यांना दिले आहे.

घाटंजी तालुक्यातील साखरा येथील चंद्रकांत चंद्रभान चौधरी यांनी आपल्या शेतीच्या प्रकरणात सदर शेत जमीन माझ्या ताब्यात व वहीतीत असतांना तहसीलदार पुजा माटोडे यांनी पैशाची मागणी केली होती. मी गरीब असल्याने पैशे देउ शकलो नाही. त्यामुळे माटोडे यांनी चुकीचा व खोटा आदेश माझे विरुद्ध पारित केला होता.

त्यामुळे तक्रारदार चंद्रकांत चौधरी यांनी मुंबई येथील अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ई मेल ने लेखी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अपर महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई ने पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी याशनी नागराजन यांना दिले आहे. सदर प्रकरणात अव्वल कारकून बागडे यांचाही सहभाग असल्याचे तक्रारदार चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले आहे.

तथापि, अव्वल कारकून सचिन बागडे यांची बदली निवडणूक विभागातील के. के. मानवटकर यांचे सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर पांढरकवडा येथे झाली होती. तसेच ते पांढरकवडा तहसील कार्यालयात 1 जुन रोजी रुजुही झाले. मात्र, ते सद्या घाटंजी तहसील कार्यालयात त्याच टेबलावर ठान मांडुन बसले आहे.

विशेष म्हणजे घाटंजी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सचिन बागडे यांची पांढरकवडा तहसील कार्यालयात 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बदली केली होती.

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणारया विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 दिनांक 25 मे 2006 अन्वये अवघड क्षेत्रातील अव्वल कारकून संवर्गाच्या प्रशासकीय बदल्या करण्यात येत असुन कर्मचाऱ्यांची बदली प्रशासकीय कारणास्तव करण्यात येत असल्यामुळे प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. रकाना क्रमांक 5 मधील पदांवर रुजु होण्यास 26 मे मध्यान्होतर एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत आहे. अन्यथा त्यांचे विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) 1979 नुसार कलम 23 भंग केला म्हणून शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, सचिन बागडे यांची पांढरकवडा तहसील कार्यालयात बदली झालेली असतांना घाटंजी तहसील कार्यालयात ठान मांडुन बसुन आहे.

विशेषत: खापरी येथील विठ्ठल बोरकर यांनी सुद्धा अव्वल कारकून बागडे यांनी पैशाची मागणी केल्याची लेखी तक्रार घाटंजी तहसील कार्यालयात दाखल केली आहे. बोरकर यांच्या लेखी तक्रारी नुसार, 6 डिसेंबर 2022 रोजी मला भुदान यज्ञ मंडळाकडुन गट नंबर 59/1 मधील 1.53 हेक्टर आर शेत जमीनीचा पट्टा मिळाला होता. बोरकर हे फेरफार करून घेण्यासाठी तलाठी तायडे यांचे कडे गेले होते. मात्र, त्यांनी सांगितले की, तहसीलदार यांचे आदेशपत्र घेऊन या, मी फेरफार करून देतो असे तलाठी यांनी शेतकरी बोरकर यांना सांगितले. त्यासाठी बोरकर यांनी तहसीलदार यांचे कडे रितसर अर्ज दाखल केला. मात्र, तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बागडे यांनी पैसे दिल्याशिवाय तुमचे काम होणार नाही, असे बोरकर यांना सांगितले. तहसीलदारांनी यांनी सुद्धा बोरकर यांना संबंधित बाबु यांनाच भेटावे, असे सांगितल्याने तसेच त्याच्या कडे पैसे नसल्याने बोरकर ने अखेर पांढरकवडा येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी व तहसील कार्यालय घाटंजी येथे लेखी तक्रार दाखल केली आहे. यामुळे घाटंजी तालुक्यात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे घाटंजी तालुक्यात भुदान यज्ञ मंडळ जमीन वाटपात प्रचंड घोळ असुन भुदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष डगवार व सदस्य बोबडे हे पदावर नसतांना भुदान यज्ञ मंडळाची शेत जमीन नियमबाह्य वाटप केल्याचा आरोप होत आहे. सदर प्रकरण उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित असुन लवकरच उच्च न्यायालयात नविन याचिका दाखल होणार असुन दोषी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना या पुर्वी पासुन शेत जमीन आहे. अशांना सुद्धा नियमबाह्य शेत जमीन वाटप करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. तथापि, लवकरच घाटंजी तालुक्यातील नियमबाह्य भुदान यज्ञ मंडळ शेत जमीनीचा भंडाफोड होणार, हे मात्र निश्चित.

घाटंजी तहसील कार्यालयातील भगत हे महसुल विभागाचे कर्मचारी आहे. मात्र, तत्कालीन तहसीलदार पुजा माटोडे यांनी कंट्रोल डिलर कडुन मलीदा गोळा करण्यासाठी भगत यांना पुरवठा विभागात निरीक्षण अधिकारी म्हणून बसविले आहे. विशेष म्हणजे या पुर्वी घाटंजी तालुक्यातील पत्रकारांना दिवाळी जाहिराती देण्यासाठी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी घाटंजी तालुक्यातील 104 कंट्रोल डिलर कडुन प्रत्येकी ₹ 3000 ते ₹ 4000 रुपये गोळा केले होते. तसेच तत्कालीन तहसीलदार पुजा माटोडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या निरोप व सत्कार प्रसंगी सुद्धा प्रत्येक कंट्रोल डिलर कडुन भगत यांनी ₹ 300, ₹ 500 गोळा केले होते, असा आरोप होत आहे. त्यामुळे भगत यांना पुरवठा विभागातुन त्यांच्या महसुल विभागात देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.