Home यवतमाळ माऊली सेलिब्रेशन हॉल ची जागा सरकार चे मालकीची च…!

माऊली सेलिब्रेशन हॉल ची जागा सरकार चे मालकीची च…!

166

सरकारने तातडीने ताब्यात घेऊन आदिवासी घरकुल योजने करिता वाटप करण्यात यावी – अंकित नैताम

पांढरकवडा :माऊली मंगल कार्यालय, हॉटेल आणि रेस्टरेंट करिता सध्या वापरात असलेली जागा ही प्रत्यक्षात सरकारी मालकीची “ई क्लास” वर्गामध्ये धारणा झालेली जागा आहे. सदर जागा ही इंग्रजांच्या काळामध्ये जिनिंग प्रेसिंग आणी उद्योग लावण्याकरिता इंडस्ट्रियल उपयोगासाठी शासनाने मोफत मध्ये “कब्जेदार” हक्काने संबंधित व्यक्तींना दिली होती. भोगवटादार खरेदी अधिकार भोगवटादार जयनारायण सागरमल रा.साडे बंगाल संभल प्रगणा बिहार व श्रीगोपाल बिहारीलाल, रा बरेदा जि गोरखपुर उत्तर प्रदेश यांनी युनायटेड अग्रोटेक यांचे कडून प्रभुदयाल रुईया यांनी सन १९३५- ३६ मध्ये सदरहू जागा हा घेतली. त्यानंतर कालांतराने त्या जमिनीचा उपयोग सरकार ची कोणतीही परवानगी न घेता वेगवेगळ्या पद्धतीने केला गेला. कोणताही नजराणा आज पर्यंत सरकारला भरलेला नाही. त्यामध्ये शासनाच्या कोणत्याही परवानगी घेतली गेली नाही.

सदर ही जागा आजही शासनाची मूळ मालकीची असल्याकारणाने ती जागा शासनाकडे जमा करावी आणि ती आदिवासी प्रभागातील असल्याने ती घरकुल योजना राबविण्यासाठी सरकारने तातडीने ताब्यात घ्यावी , अशी आमची मागणी , आदिवासी चळवळीचे प्रणेते अंकित नैताम, माजी नगरसेवक यांनी
पांढरकवडा नगर परिषद व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केली आहे.