Home यवतमाळ चिमुकल्यांच्या कुंचल्यातुन अवतरले पर्यावरणाचे रंग “वाघाडीवर जैवविविधता दिवस संपन्न”

चिमुकल्यांच्या कुंचल्यातुन अवतरले पर्यावरणाचे रंग “वाघाडीवर जैवविविधता दिवस संपन्न”

113

यवतमाळ (प्रतिनिधी) जैवविविधता दिवसाचे निमीत्ताने वाघाडी येथे स्वच्छ सुंदर वाघाडी अभियानांतर्गत यवतमाळकर पर्यावरणस्नेहींच्या उपस्थितीत नियमीत श्रमदानाबरोबर निसर्ग चित्रकला आणि सीडबाँल निर्मीती स्पर्धा पार पडली. चिमुकल्यांच्या कल्पनाशक्तीने त्यांचे कुंचल्यातुन निसर्गाचे नानाविध पैलु दोन तासांच्या आत कॅनव्हाँसवर अवतरले. काही बालगोपालांनी तर चक्क लाईव्ह पेंन्टींग तर कुणी पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी चित्रे आपल्या कला कौशल्यातुन साकारत उपस्थितांची मने जिंकली.


यवतमाळचा एतिहासिक वारसा असलेल्या वाघाडी नदीचे प्रदुषणापासुन संरक्षण व्हावे, पर्यावरण रक्षणाचा विविध उपाययोजनांचा कित्ता गिरवील्या जावा या जनजागृतीच्या उद्देशाने हे आयोजन करण्यात आले होते.
निसर्गचित्र स्पर्धेमध्ये अ, ब, क गटामध्ये आरव देशकर, नंदन गायकी, पुर्वजा बेलखेडे, निधी डहाके, अथर्व फुंदे, सिध्दी हमदापुरे, प्रणय मसराम, कौशीकी माइंदे, पियुष पराते, आचल लाभसेटवार, रुत्वी पोबारु, राहुल गुल्हाने यांनी प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ बक्षिस प्राप्त केले. अतिथी तथा परिक्षक म्हणुन सर्वश्री अजय मुंधडा, डाँ अर्चना जोशी, डाँ हर्षल राठोड, साहेबराव साखरकर, सुरज मडगुलवार, अनुप किन्हीकर, अजीत मोहदरकर यांची उपस्थिती होती. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण पुस्तक, रोपाची कुंडी, डायरी, पेन, पॅडसह प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण गीत आणि पर्यावरण संदेश सादर केलेत.
यावेळी प्रास्ताविकातुन श्री अजय मुंधडा यांनी वाघाडी येथील सेवाकार्याचे पर्यावरणीय महत्व विषद करित यवतमाळकरांनी प्रत्येक रविवारी उपस्थित राहण्याची साद घातली. संतोष भोयर यांनी सुत्रसंचालन केले तर अश्वीन सवालाखे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
आयोजनाकरिता पर्यावरण संरक्षण समिती, टी.डब्लु.जे. फाउंडेशन, यवतमाळ प्लाँगर्स, एसएल फाउंडेशन, जनसेवा फाउंडेशन, बी काइंन्ड, अस्तीत्व फाउंडेशन, वसुंधरा फाउंडेशनचे शुभम पंचभाई, आशिष कांबळे, सुमंत ठाकरे, अतुल टाके, इसुभाऊ मारवे, अविनाश बोबडे, भुषण क्षीरसागर, भुषष ढोबळे, प्रफुल्ल धोटे, आशिष हिंगलासपुरकर, यामिनी घरत, अल्केश अंभोरे, मोहीत ढोले, अभीजीत गुल्हाने, सौरभ नाहर, समीर भांडेगावकर, मिनाक्षी ढोबळे, आरती धनेवार, वर्षा पडवे यांनी सहकार्य केले.
——————-
चौकट
*२२ प्रकारच्या बियाण्यांचे २ हजारावर सीडबाँल*
सीडबाँल निर्मीती स्पर्धेसाठी २२ प्रकारचे बियाणे रामचंद्र ढोबळे यांनी उपलब्ध करुन दिले होते. भसवा माती, चिकण माती आणि नैसर्गिक खताचा वापर करित स्पर्धेदरम्यान दोन हजारपेक्षा जास्त सीडबाँल निर्मीती करण्यात आली. समुह गटात प्रयास यवतमाळ, गृहरक्षक दल, जनसेवा महिला बचतगट यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय बक्षिस प्राप्त केले. वैयक्तिक गटात प्रज्वला काणेकार, सनीत काणेकार, वैश्वी हजारे, शौर्य उत्तरवार यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ बक्षिस प्राप्त केले. पावसाळ्यात वाघाडी नदिच्या दुतर्फा ही सिडबाँल भिरकवीण्यात येणार आहेत.
————-
चौकट
*स्वयंस्फुर्त श्रमदान*
वाघाडी येथे ३९ आठवड्यांपासुन पर्यावरणपुरक विवीध उपक्रम राबवीण्यात येत आहेत. या रविवारी स्पर्धांचे आयोजन सुरु असतांना देखील संस्था, संघटनांच्या सेवाकर्त्यांनी स्वयंस्फुर्तपणे श्रमदान केले. राज्य शासनाच्या चला जाणुया नदीला या उपक्रमांतर्गत जलजागृती सुरु असुन रविवारी एक तास वाघाडीसाठी ही मोहीम यवतमाळकर पर्यावरण स्नेहींसाठी राबवीली जात आहे.