Home यवतमाळ यवतमाळचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दलालाच्या हातात, “जनतेचे हाल बेहाल”

यवतमाळचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय दलालाच्या हातात, “जनतेचे हाल बेहाल”

200

विनोद पञे ‌

यवतमाळ – यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जनतेचे हाल – बेहाल होत आहे. तसेच १० ते १२ हजार चालक परवाने चालकापर्यंत पोहचले नाही. मागील ५ महिने पासुन कार्यालयात स्मार्ट कार्ड उपलब्ध नाही आणि सदर कार्यालयात दलालाशिवाय कुठलेही काम होत नाही. काम करायचे असेल तर अधिकारी या दोन व्यक्तीकडे पाठवितात. निलेश व नितीन हे व्यक्ती आहे तरी कोण हे जनतेला कळायला पाहिजे तसेच सदर कार्यालय आवठड्यात ५ दिवस आहे आणि एक अधिकारी दोन दिवस असतात तर एक अधिकारी दुपारी जेवायला गेले की ५ वाजता येतात. या दोन अधिकारी मध्ये आपसात जमत नाही. त्यामध्ये जनतेचे मोठे हाल बेहाल होत आहे. पासींगला सुध्दा रेट ठरलेला आहे. पैसे दिले नाही तर गाडी पासींग होत नाही किंवा गाडी परत पाठविली जाते. साहेबांची पेट्रोलींगच्या नावावर फक्त वसूली चालू आहे. हजारो गाड्यांचे हप्ते बांधले आहे आणि सामान्य जनतेला त्रास दिला जात आहे. परिवहन आयुक्त व जिल्हाधिकारी साहेबांनी जातीने लक्ष घालून कारवाई करावी आणि या दोन्ही अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करावी. अन्यथा १० दिवसात बळीराजा पार्टी कार्यालयाला कुलूप ठोकून आमरण उपोषण करेल असा इशारा बळीराजा पार्टीच्या वतीने निवेदनाव्दारे प्रशासनाला देण्यात आला.