Home यवतमाळ कायमस्वरूपी लिज पट्टे मिळावे याकरिता सामाजिक कार्यकर्ता सैय्यद इर्शाद सैय्यद इद्रीस यांची...

कायमस्वरूपी लिज पट्टे मिळावे याकरिता सामाजिक कार्यकर्ता सैय्यद इर्शाद सैय्यद इद्रीस यांची मागनी.

301

नेर प्रतिनिधि:

आमदार श्री. संजयभाऊ राठोड औषध प्रशासन मंत्री यांना फुकट नगर नेर येथील वास्तव्यास असणारे आपल्या मतदार संघातील अतिक्रमणधारक. आम्ही राहत असलेल्या घराचे कायमस्वरूपी लिज पट्टी मिळणेबाबत… यात मी व वरील सर्व अतिक्रमणधारक सेवेशी विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की आम्ही वरील ठिकाणचे सर्व कायमस्वरूपी रहिवासी असून आम्ही मागील पिढ्यानपिढ्या पासून वरील नगरात वास्तव्यास आहोत.आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी शासनामार्फत राबवत येणाऱ्या वेगवेगळ्या योजना व पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहलेलो आहोत. सदरची जागा हि सरकारी असल्यामुळे भविष्यात आम्ही बांधलेले तात्पुरते घर नगर परिषदेमार्फत किंवा शासनामार्फत अतिक्रमण आणल्यास पाडून टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास आमचा संसार व मुले बाळ उघड्यावर आल्याशिवाय राहणार नाही.आपण मौजा नेर येथे भीमनगर, टोलीपुरा, अशोक नगर, हनुमान नगर येथील राहणाऱ्या नागरिकांना आपण केलेल्या प्रथनामुळे व आपणाद्वारे केलेल्या प्रायश आल्यामुळे वरील नगरातील अतिक्रमण धारक नागरिकांना कायमस्वरूपी लिज पट्टे मिळाले असून त्यांना सर्व शासकीय योजनाचा व प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे आमच्या वस्तीमध्ये सुद्धा वरील वस्त्यांप्रमाणे प्रयत्न करून आम्हाला सुद्धा कायमस्वरूपी लिज पट्टे देणेसंदर्भात आपन ‌योग्य ते प्रयत्न करावे तसे लिज पट्टे आम्हाला मिळाल्यास या लिजट्ट्याची योग्य ति शासकीय फी भरणा करण्यास आम्ही तयार आहोत,

सबब आमची मा. पालकमंत्री साहेब यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्य आपल्याला काळकळीची विनंती आहे की, आम्हीसुद्धा आपल्याच मतदार संघातील कायमचे रहिवासी असून आपलेच नागरिक आहोत. आम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे आम्हाला जीवन जगण्याचा सुद्धा अधिकार आहे. त्याकरिता आम्हाला कायमस्वरूपी राहण्याकरिता घराची आवश्यकता असल्यामुळे आम्ही ज्या वस्त्यांमध्ये राहतो त्या वस्त्यांमध्ये सर्व अतिक्रमण धारकांना लिज पट्टे करण्यात यावे. अशी विनंती निवेदनाव्दारे  सैय्यद ईरशाद , सैय्यद साबिर , इफ्तेखार खान ,  शेख इरफ़ान‌, अमजद खा , शोएब पठान ,  फारूक दिवांजी अदि उपस्थित  नागरिकांनी केली आहे .