Home यवतमाळ सावरगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम गीतांचा प्रबोधन कार्यक्रम

सावरगांव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीम गीतांचा प्रबोधन कार्यक्रम

159

सावरगांव येथे आकाश राजा गोसावी आणि जयश्री भडांगे यांच्यात रंगला कव्वालीचा मुकाबला..!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी :- भीम ज्योती ट्रस्ट र.जि.न. 794 सावरगांव यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्य घाटंजी तालुक्यातील सावरगांव (मंगी) येथे पंचशील बुध्द विहारा जवळील के. जे. एस व गजानन महाराज शाळेचा मैदानात उदघाटन व भिम गीतानाचा प्रबोधनकार कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संघपाल कांबळे, कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयप्रकाश काटपेल्लीवार, प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी पंचायत समितीचे माजी सभापती रूपेश कल्यमवार, राजापेठचे सरपंच रमेश आंबेपवार, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनंत चौधरी, सगदाचे उपसरपंच नितीन नार्लावर, वन क्षेत्र सहाय्यक धम्मानंद मेश्राम, भाऊ कराळे (वनपाल ) मुख्याध्यापक अशोक करमणकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गणपत कन्नलवार, पारवा ग्रामपंचायतचे सदस्य बालाजी पोटपेल्लीवार, कंट्रोल डिलर रामदास कुक्कलवार, पत्रकार महेंद्र देवतळे, पांडुरंग निवल, प्रदीप वाघपैजन, सामाजिक कार्यकर्ते दशरथ मोहूर्ले, केंद्र प्रमुख रवी आडे, गुलाब सिसले, रा. वि. नगराळे, डोंगरसिंग खोब्रागडे, सुलोचना गजाम, कलावती वानखडे, माधुरी कांबळे, ॲड. जयपाल पाटील, हरिदास कांबळे, मनोज कन्नलवार, देविदास प्रधान, गुलाब कन्नलवार, राजू कन्नलवार, दत्ता मोहूर्ले आदीं मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालकन कवीश्वर ठमके यांनी केले. तर आभार घाटंजी तालुका पत्रकार संघाचे सचिव अरुण कांबळे यांनी मानले. उपस्थितीत मान्यवरांना भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन सत्कार करण्यात आला.

भिम गीतांचा प्रबोधन व कव्वाली कार्यक्रम प्रबोधनकार गायक कव्वाल आकाश राजा गोसावी नागपूर संच व महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका कव्वाल जयश्री भडांगे मुंबई – बदलापूर संच या दोन गायक मध्ये भीम गीतानाचा व प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात स्री, पुरुष, युवक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची आयोजन समिती भीम ज्योती ट्रस्ट र. जि. न. 794 सावरगांवचे कपिल वानखडे, अतुल नगराळे, रवी वाघमारे, पत्रकार अरुण कांबळे, रमेश पाटील, विनोद कांबळे, सुनील तेलंग, प्रकाश पाटील, सल्लागार समिती दादाराव धुमाळे, प्रफुल वानखडे, रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, कुर्ली बिटचे जमादार अविनाश मुंडे व पारवा पोलीस स्टेशन चे विशेष सहकार्य लाभले.