
गडचिरोली ,
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या संकल्पनेतून
सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम यांचे हस्ते विहिरगाव ग्रामपंचायत येथे अनेक गोरगरिबांना ई-श्रम कार्ड तसेच पॅन कार्ड वआभा कार्ड मोफत वाटप करण्यात आले. शासकीय उपक्रमांचे लाभ गरिब जनतेला व्हाव या हेतूने अनेक शासकीय योजनांची माहिती या वेळी देण्यात आली. उपस्थित विहीरगाव ग्रामपंचायत जि.प. शाळेचे मुख्याध्यापक हेमके सर ग्रामपंचायत सदस्य निखिल बारसागडे हे उपस्थित होते.
शासकीय योजना प्रत्येक गरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे या हेतूने आम्ही सतत काम करत राहू असे आश्वासन तनुश्रीताई आत्राम यांनी विहीरगाव येथील ग्रामस्थांना दिले.










































