Home यवतमाळ कळंब येथील पत्रकाराला धमकी देणाऱ्या नगराध्यक्षाच्या गुंड मुलावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार ठाणेदार...

कळंब येथील पत्रकाराला धमकी देणाऱ्या नगराध्यक्षाच्या गुंड मुलावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार ठाणेदार खरंच कारवाई होणार का?

231

बेभान सुटलेल्या नगराध्यक्षाच्या गुंड मुलाला पोलीस प्रशासन आवर घालणार का ?

वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून वाद.

यवतमाळ – कळंब येथील भगवान श्री चिंतामणी जन्मोत्सव निमित्त मंदिराला लागून असलेल्या आठवडी बाजार परिसरात दरवर्षी भव्य एक महिना जत्रा भरते. या जत्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झुले (पाळणे), मौत का कुवा, पन्नालाल गधा, विविध प्रकारच्या लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी इत्यादी दुकाने जत्रेत यायची यानिमित्ताने ग्रामीण भागातील गोरगरीब मजूरदार नागरिक जत्रेमध्ये जीवनापयोगी वस्तू खरेदी करून जायचे व सोबतच पाळण्यामध्ये लहान मुलांना बसून मनोरंजन करायचे. परंतु दिवसेंदिवस परिवर्तन होत गेले. ग्रामपंचायत ची नगरपंचायत झाली अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पदाधिकारी म्हणून निवडून आले आणि त्यांनी आपल्या सोयीनुसार बदल करणे सुरू केले. यावर्षी सुद्धा नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी त्याच्या नियोजन शून्य ते मुळे चिंतामणी मंदिराजवडील आठवडी बाजार परिसरात जत्रेतील काही दुकान लावली तर झुले मनोरंजनाची साधने हे एका शेतकऱ्याच्या शेतात जागेचा मोबदला देऊ न गावा बाहेर गेले. त्यामुळे दुरून दुकाने जत्रेत येऊन धंदा करणाऱ्या व्यावसायिकांच्या धंद्याला मार बसला. वास्तविक पाहता दुकाने व झुले याचे एकाच ठिकाणी नियोजन करायला पाहिजे होते परंतु नगरपंचायत नगराध्यक्षाला चिंतामणी जन्मोत्सवाचे काहीच देणे घेणे नसल्यामुळे त्यांनी आठवडी बाजार परिसरात भरत असलेल्या जत्रेचे धिंडवडे निघुन जत्रा मोडकळीस आणण्याचा एक कलमी कार्यक्रम सत्तेतील नगरसेवक वापरत असल्याची शहरवासी यामध्ये चर्चा सुरू झाली . त्यामुळे दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी शेषराव मोरे यांनी”जत्रा भरली शहरात तर झुले गेले जंगलात”अशा प्रकारचे वृत्त दैनिक देशोन्नती मध्ये प्रकाशित केले. त्यामुळे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष च्या गावगुंड मुलाला या बातमीचा राग आला आणि तोच राग मनात ठेवून दैनिक देशोन्नती चे प्रतिनिधी शेषराव मोरे हे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास इंदिरा गांधी चौक येथे हजर असताना नगराध्यक्षा चा मुलगा सरोज उर्फ सोनू फारूक सिद्दिकी वय तीस वर्ष राहणार इस्लामपुरा मज्जिद च्या मागे पत्रकाराला मारण्याच्या उद्देशाने एक्टिवा गाडीने येऊन सदर बातमी का लावली म्हणून पत्रकाराच्या अंगावर गाडी घालत अश्विल शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यामुळे त्यांना पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी.जेणेकरून अशा गावगुंडाची लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकाराला शिवीगाळ करण्याची किंवा मारहाण करण्याची हिम्मत होणार नाही. व त्यांच्या दहशती ला आळा बसून शहरात शांतता नांदेल. अशी शहरातील सर्व पत्रकारांतर्फे मागणी करण्यात येत आहे.