
( विनोद पत्रे )
—————-
यवतमाळ : घाटंजी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी अयनुद्दीन सोलंकी यांची अविरोध निवड करण्यात आली. सदरची बैठक पत्रकार असलम कुरैशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या वेळी घाटंजी तालुक्यातील बातमीदार, पत्रकार आदींच्या समस्या तसेच प्रश्न सोडविणार असल्याचे मत नव निर्वाचित अध्यक्ष अयनुद्दीन सोलंकी यांनी व्यक्त केले.

घाटंजी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी अयनुद्दीन सोलंकी यांची यावेळी अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी दैनिक लोकदुतचे तालुका प्रतिनिधी संतोष पोटपिल्लेवार, सचिव पदी दैनिक नमो महाराष्ट्रचे अरुण कांबळे, कोषाध्यक्ष पदी पत्रकार असलम कुरैशी, सह सचिव पदी तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी मुकेश चिव्हाणे आदींची अविरोध निवड करण्यात आली.तर पत्रकार संघाच्या सदस्य पदी दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी आकाश बुर्रेवार व दैनिक नागपूर पोस्टचे तालुका प्रतिनिधी प्रदीप वाकपैंजन यांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सचिव पदी दैनिक नमो महाराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी अरुण कांबळे व सदस्य पदी इंग्रजी दैनिक नागपूर पोस्टचे तालुका प्रतिनिधी प्रदीप वाकपैंजन हे महत्वाच्या बैठकीला पांढरकवडा व अमरावती येथे गेल्याने त्यांचेही व्हिडिओ काॅन्फ्रसिंग द्वारै बोलनी करण्यात आल्याने त्यांची सुद्धा या वेळी अविरोध निवड करण्यात आली. अखेर आभार दैनिक नवराष्ट्रचे घाटंजी तालुका प्रतिनिधी आकाश बुर्रेवार यांनी मानले.











































