Home महत्वाची बातमी गॅस ग्राहकांना बजेट पूर्वीच दरवाढीचा दणका

गॅस ग्राहकांना बजेट पूर्वीच दरवाढीचा दणका

187

225 रुपये नि सिलेंडर महागले

अमीन शाह

सर्वसाधारण अर्थसंकल्पआधी (Budget 2020) व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किंमती वाढल्या आहेत. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळं आता सर्वसामन्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. वाणिज्यिक गॅस सिलिंडरमध्ये (Commercial gas cylinder) 224.98 रुपयांची वाढ झाली आहे. त्याच वेळी देशांतर्गत एलपीजीच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरची वाढीव किंमत वाणिज्य गॅस सिलिंडरवर 224.98 रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर व्यापा्यांना आता व्यावसायिक सिलिंडर्ससाठी 1550.02 रुपये द्यावे लागतील. शनिवारी वाढीव किंमती लागू झाल्या आहेत.
वाचा-मोदींच्या ड्रीम योजनेने तोडले उद्योजकाचे स्वप्न, सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या.

घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या पाच महिन्यांपासून किंमती सातत्याने वाढतच होती. त्याचबरोबर आज सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हणजेच, 14.2 किलो सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. फेब्रुवारीमध्ये तुम्हाला 14.2 किलो सिलिंडर फक्त 749 रुपयांना मिळेल. याशिवाय ग्राहकांच्या खात्यात 238.10 रुपये अनुदान दिले जाईल.