Home विदर्भ नेहरू युवा केंद्र वर्धा मार्फत सचिन महाजन यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

नेहरू युवा केंद्र वर्धा मार्फत सचिन महाजन यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

305

प्रतिनिधी- प्रमोद झिले- येरला

वर्धा / हिंगणघाट. नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार जिल्हा युवा समन्वयक शिवधन शर्मा यांच्या हस्ते स्वयंसेवक सचिन महाजन यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हिंगणघाट तालुक्यातील वडणेर परिसरात नेहरू युवा केंद्राचे सचिन महाजन हे स्वयंसेवक म्हणून गेल्या दोन वर्षांपासून काम करीत आहे त्या बद्दल त्यांना प्रमापत्र देण्यात आले.नेहरू युवा केंद्र वर्धा च्या वतीने अमरावती येथे पंधरा दिवस प्रशिक्षण घेवून प्रशिक्षनामध्ये सामाजिक विविध क्षेत्रात कार्य कौशल्य शिबीर, बोलन्याची स्किल डेवलोपमेंट,स्टेज डेरिंग,विविध स्पोर्ट् स्पर्धा,योगा,स्वछता,वृक्षारोपण,रनींग इत्यादी कार्यक्रम राबवित ते काम करीत आहे. अमरावती जिल्ह्याचे समन्वयक स्नेहल बासुतकर मॅडम मार्गदर्शक शिक्षक सुबोध मोहिते स्टेट डायरेक्टर ज्योती मोहिते यांनी पंधरा दिवस प्रशिक्षण दऊन मार्गदर्शन केले,हिंगणघाट तालुक्यातील सचिन महाजन यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले . गावागावात युवा मंडळ बनून विविध उपक्रम राबविले समाजकार्य व पत्रकार सामाजिक क्षेत्रात सतत काम करत असल्याने नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेळ मंत्रालय भारत सरकार च्या मार्फत सन्मानपत्र जिल्हा युवा समन्वयक शिवधन शर्मा यांच्या हस्ते सन्मानपत्र सचिन महाजन यांना देण्यात आले,सन्मानित केल्याबद्दल संस्थेचे हिंगणघाट परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहेत, नेहरू युवा केंद्र वर्धा ,सलग्णीत युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थेचे संस्थापक राहुल दुरतकर, संस्थेचे मार्गदर्शक ,लेखापाल दयाराम रामटेके,संजय माठे ,प्रा डॉ उत्तम पारेकर व पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांनि व पत्रकार सदस्यांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात आले.