Home यवतमाळ घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोक अदालत संपन्न..!

घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोक अदालत संपन्न..!

256

➡️ लोक अदालतीत अनेक प्रकरणाचा निपटारा..!

( अयनुद्दीन सोलंकी )
———————————
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील प्रलंबित तथा वादग्रस्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी शनिवारी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. घाटंजी येथील लोक अदालतीत पॅनल क्रमांक १ वर दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात हे होते. तर पॅनल अधिवक्ता म्हणुन ॲड. सादीक खान हे उपस्थित होते. तसेच पॅनल क्रमांक २ वर दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर हे होते. तर पॅनल अधिवक्ता म्हणुन ॲड. आर. एन. कावळे हे उपस्थित होते.

घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी झालेल्या लोक अदालतीत बॅकेच्या तडजोडी बाबत ३३ लाख १५ हजार ११९ रुपये वसुल करण्यात आले. निगेशिऐबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट १३८ प्रकरणात १२१ केसेस पैकी फक्त ८ केसेस तडजोड करण्यात आले. यात ६५ लाख ५२ हजार ३९१ रुपये वसुल करण्यात आले. ईतर दिवाणी प्रकरणात ७७ केसेस पैकी केवळ १ केस तडजोड करण्यात आली. यात ५६ हजार २०० रुपये वसुल करण्यात आले.

घाटंजी येथील लोक अदालतीत घाटंजी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अनंतकुमार पांडे, ॲड. निलेश चवरडोल, घाटंजीचे ठाणेदार मनिष दिवटे, पारवाचे ठाणेदार विनोद चव्हाण या सह घाटंजी व पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.

दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत कनिष्ठ लिपिक व्ही. एस. शेंडे, कु. एस. पी. भगत, लघु लेखक ए. एम. सैय्यद, बेलीफ जी. पी. दिकुंडवार, शिपाई एस. जी. आकोलकर, वरिष्ठ लिपिक वाय. व्ही. दरणे, कनिष्ठ लिपिक वाय. व्ही. ददगाळ, शिपाई लखन आडे, शिपाई एम. ए. भवरे आदींनी लोक अदालतीत सहकार्य केले. तसेच दंड वसुली प्रकरणात सहाय्यक अधिक्षक पी. बी. बागडे, वरिष्ठ लिपिक आर. एम. बुटले, कनिष्ठ लिपिक ए. के. देशट्टीवार आदींनी लोक अदालतीत सहकार्य केले. या वेळी न्यायालय परिसरात दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत घाटंजी तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रकरणे तडजोडीसाठी उपस्थित होते, हे येथे उल्लेखनीय.