Home विदर्भ श्री क्षेत्र नारायणपूर येथे आज पासून यात्रा महोत्सव सुरुवात

श्री क्षेत्र नारायणपूर येथे आज पासून यात्रा महोत्सव सुरुवात

154

 

नारायणपूर. प्रतिनिधी
वर्धा –  समुद्रपुर तालुक्यातील नारायणपूर येथे श्री गोपाल कृष्ण मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेला परंपरागत यात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो गेल्या दोन वर्षांपासून कोरोना मुळे यात्रा उत्सव साजरा करण्यात आला

नव्हता परंतु या वर्षी परंपरेने उत्सव साजरा करण्यात येत आहे सदर यात्रा महोत्सव निमित्ताने ह.भ.प.दिलीप महाराज रोकडे ह.भ.प.प्रकाश महाराज चंदनखेडे गुरुवर्य पुंडलिक महाराज बोरुटकर यांचे हरीकीर्तनाचे आयोजन करण्यात आले असून उद्या दि.७ नोव्हेंबर रोज सोमवार ला रात्री १२ वाजता त्रिपुर दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दि.९ नोव्हेंबर रोज बुधवार ला गुरुवर्य पुंडलिक महाराज बोरुटकर यांचे हरीकीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारी दोन वाजता दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे