Home यवतमाळ घाटंजी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत…!

घाटंजी तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत…!

142

 

◼️तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याचा आरोप.!

( अयनुद्दीन सोलंकी )
————————-
घाटंजी : घाटंजी तालुका हा आदिवासी बहुल भाग असून येथे आरोग्याच्या अनेक समस्या आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याने घाटंजी तालुक्यातील रुग उपचारार्थ खाजगी डॉक्टरकडे जात आहे.

घाटंजी तालुक्यात पारवा, शिवणी, रामपूर व भांबोरा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्राथमिक आरोग्य उपकेंद्र २८ असून अनेक दिवसांपासून अनेक उपकेंद्र बंद अवस्थेत आहे. या उपकेंद्राच्या ठिकाणी डाॅक्टर, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक न ईतर कर्मचारी उपस्थित राहत नाही.

घाटंजी तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून 28 आरोग्य उपकेंद्रे आहे. घाटंजी तालुका हा आदिवासी बहूल भाग असून आरोग्याच्या अनेक समस्या या भागात असून अनेक गावात तापाची साथ सुरू असून अनेक रुग्ण गावात उपचार मिळत नसल्याने रुग्णांना उपचारार्थ तालुक्याच्या ठिकाणी खाजगी डॉक्टर कडे जावे लागत आहे. मात्र, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उप केंद्रात वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्यामुळे हा भुर्दंड नागरिकांना पडत आहे. काही दिवसांपूर्वी देवधरी गावात दूषित पाणी पिल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर अनेक गावांत गर्भवती महिलांची प्रसूती वैद्यकीय अधिकारी अभावी घरीच होत होती. मागील काही महिन्यात बाल व माता मृत्यू चे प्रमाण सुध्दा घाटंजी तालुक्यात वाढलेले आहे.

प्राथमिक आरोग्य उप केंद्रात सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका, आशाताई, मदतनिस असे नियमानुसार कर्मचारी असतात.
मात्र, घाटंजी तालुक्यातील अनेक उपकेंद्र सध्यातरी बंद अवस्थेत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून आरोग्यासाठी लाखो रुपये खर्च करून आरोग्य उपकेंद्र ईमारतीचे बांधकाम केले. तसेच अनेक ठिकाणी ईमारतीची दुरुस्ती करण्यात आली. परंतु अद्याप अनेक उपकेंद्रात कर्मचारी मुख्यालयी राहतांना दिसत नाही. काही आरोग्य उप केंद्रे हे कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्या भरोशावर असल्याचे दिसून येते. तालुक्यातील अनेक उपकेंद्र बंद असल्यामुळे लोकांना उपचारासाठी बाहेरगावी किंवा खाजगी डॉक्टर कडे जावे लागत आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी वा आरोग्य सेविक, आरोग्य सेविका आदीं करिता मुख्यालयी राहण्याची व्यवस्था असतांना अनेक अधिकारी वा कर्मचारी मुख्यालयी उपस्थित राहत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकारी आदींनी अद्यापही घाटंजी तालुक्यातील प्राथमिक उप केंद्राला भेटी दिलेल्या नसल्याचे समजते. खुद्द तालुका आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण हे सुद्धा मुख्यालयी राहत नसून यवतमाळ वरुन घाटंजीला ये जा करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात किरकोळ स्वरूपाच्या रूग्णांना सुद्धा थेट तालुका वा जिल्ह्याच्या ठिकाणी उपचारासाठी हलविल्या जात असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. अशावेळी आर्णी – केळापूरचे आमदार डाॅ. संदीप धुर्वे हे स्वतः डाॅक्टर असल्याने त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वा प्राथमिक आरोग्य उप केंद्राला गोपनीय रित्या भेटी भेटी देऊन सखोल चौकशी व पाहणी करून दोषी तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व ईतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.