Home जळगाव १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने पळविले

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने पळविले

251

भुसावळ:{आनंद पाटील}
भुसावळ शहरातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. बाजारपेठ पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अनोळखी व्यक्तीने दि. २५ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. हरीश भोये करीत आहेत.