Home यवतमाळ पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यात लाखो रूपयांच्या, दागीनेसह मूद्धेमाल पारवा पोलीसांनी...

पारवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यात लाखो रूपयांच्या, दागीनेसह मूद्धेमाल पारवा पोलीसांनी हस्तगत केला..!

187

 

➡️ पारवा पोलीसांची उत्कृष्ट कामगिरी…!

( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी : तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील सप्टेंबर महिण्यात सावळी सदोबा दूरक्षेत्र मधील सावळी सदोबा, केळझरा वरठी व पाळोदी या गावामध्ये रात्रीच्या वेळी घरफोडी करून सोन्याचे दागदागिने व मोबाईल चोरी झाल्याच्या तीन वेगवेगळ्या घटनांची नोंद झालेली होती.

विशेष म्हणजे सावळी सदोबा गावांमध्ये शहिद जवान ज्ञानेश्वर आडे यांचे कुटूंबियांचे घर होते. त्या चोरीच्या घटने बाबत ३ सप्टेंबरला नूनेश्वर गोविंदा आडे रा. कृष्णनगर केळझरा ता. आर्णी यांनी तक्रार दिलेली होती. सदर गुन्ह्यात एकूण २ लाख ४२ हजार ३९४ किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीस गेलेले होते.

शहिद कुंबीयांचे घरी घरफोडीची घटना लक्षात घेता, घटनेच्या ठिकाणी पांढरकवडा येथील उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांनी भेट देवून श्वानपथक, फिंगर प्रिंट तज्ञ यांचे मदतीने तपास झालेला होती. तेव्हा पासून सदर घरफोडीचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे (सावळी दूरक्षेत्र प्रभारी अधिकारी) यांनी केला होता. गुन्हा घडल्या पासून सातत्याने आरोपी बाबत शोध घेतला असता गुन्हे प्रणाली वरून यवतमाळ पोलीस स्टेशन ग्रामीणचे ठाणेदार जूनघरे यांनी पोलीस पथकाच्या मदतीने अटक केलेले आरोपी यांचेकडे विचारपूस करून, आरोपींना अटक करून पोलीस कोठडी घेतली.

पोलीस कोठडी मध्ये आरोपी सलिम बशिर खान (वय ३२) जिवन कडू चव्हाण (वय २८) रा. शकलगांव ता. आर्णी यांचे कडे विचारपूस करता त्यांनी सावळी सदोबा, केळझरा वरठी व पाळोदी येथील घरफोडी केल्या बाबत कबूल दिलेली असून आरोपींनी घरफोडीतील सोन्याचे दागदागिने एकूण ४८.१०० ग्राम रुपये २ लाख ५० हजार रुपये किमतीचे जप्त करण्यात आले आहे. मोबाईल बाबत तपास सुरू असून तोही मुद्देमाल हस्तगत करण्यात येणार असल्याचे पारवा पोलीसांनी सांगितले.

शहिद कुंबीयांचे घरी घरफोडीची घटना व सावळी सदोबा दूरक्षेत्रातील मोठ्या रकमेचा घरफोडीचा गुन्हा पारवा पोलीसांनी उपडकीस आणलेला असून २ लाख ५० हजार किंमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. याबरोबरच ३ चोरीचे गुन्हे देखील उघडकीस आणलेले आहेत.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील – भूजबळ, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, सुरेश येलपुलवार, संजय पांडे, नापोशी राहूल राठोड, पोशी जिवेंद्र वाघमारे, पोशी अमोल वाढई यांनी पार पाडल्याची माहिती ठाणेदार विनोद चव्हाण यांनी दिली.