Home यवतमाळ बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत जय सहकार पॅनलचा नेत्रदिपक विजय

बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणूकीत जय सहकार पॅनलचा नेत्रदिपक विजय

264

यवतमाळ – शहरातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य कै. बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यवतमाळ र.न. 328 या पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. आज झालेल्या मतमोजणीत चिंतामण पांडे यांच्या नेर्तृत्वातील जय सहकार पॅनलने नेत्रदिपक विजय प्राप्त केला आहे. पॅनल प्रमुख खुद्द चिंतामन प्रभाकर पांडे हे 922 मते घेऊन विजयी झाले आहे.
सर्वसाधारण कर्जदार प्रतिनिधी या मतदार संघात विजयी उमेदवार असे सुभाष आनंदराव अतकर (917 मते), राजेश जयंतराव निशाआने (910), गिरीधर सदारंगलाल बैसानी (908), प्रमोद विनायकराव येंडे (903), सुर्यकांत बापुराव वैद्यवार (908), या मतदार संघात एकूण 1019 वैध मतपत्रीका होत्या, त्यात 36 मत पत्रीका अवैध ठरल्या.
विमुक्त जाती भटक्या जमाती प्रतिनिधी मतदार संघात विजयी उमेदवार बादल भिमराव राठोड (951 मते), एकूण 1018 मते, अवैध 32, वैध 986. महिला राखीव मतदार संघात – अर्चना अशोक ठोकळ 950 मते, अर्चना देवेंद्र सरमुकदम 932, एकूण मतपत्रीका 1018 मते, अवैध 28, वैध 990. निकालानंतर विजयी उमेदवारांनी आयुर्वेदिक कॉलेज आर्णी रोडपासून पतसंस्थेच्या कार्यालयापर्यंत विजयी मिरवणूक काढली. कै. बाळासाहेब पांडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या या निवडणूकीत परिवर्तन पॅनलने देखील आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. परंतू शेवटच्या क्षणी परिवर्तन पॅनलच्या सहा उमेदवारांनी त्यांचा पाठिंबा जय सहकार पॅनलला जाहिर केला होता.
तसेच जय सहकार पॅनलचे काही संचालक यापुर्वीक अविरोध विजयी झाले होते.
आज नगर परिषद शाळेत मतमोजणी करण्यात आली. निकाल घोषीत झाल्यानंतर जय सहकार पॅनलच्या सहकार्‍यांनी एकच जल्लोष केला. मतदारांनी जो विश्‍वास आमच्या पॅनलवर दाखविला त्याबद्दल सर्वांचे आभार पांडे यांनी मानले.