Home विदर्भ राज्य परिवहन तर्फे मुलांनाही मोफत मिळावी – प्रा.दिनेश राठोड यांची मागणी…!

राज्य परिवहन तर्फे मुलांनाही मोफत मिळावी – प्रा.दिनेश राठोड यांची मागणी…!

201

 

प्रतिनिधी- प्रमोद झिले येरला,

वर्धा / हिंगणघाट  – अहिल्याबाई होळकर योजना’ बारावीपर्यंत मुलींना लागू केली. ही योजना लाखो मुलींना वरदान ठरली आहे,
परिवहनतर्फे मुलींना इयत्ता 12 वि पर्यंत मोफत पास मिळते
एस.टी.च्या मोफत पासची ‘अहिल्याबाई होळकर योजना’ बारावीपर्यंत मुलींना लागू केली आहे. ही योजना लाखो मुलींना वरदान ठरली असून ती आम्हाला राज्यातील कोणत्याही शाळेत दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींना आपल्या गावाजवळच्या शाळेत शिक्षणासाठी जाण्याकरिता राज्य शासनाने ‘अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना’ सुरू केली. त्यामुळे मुलींना आपल्या आवडीच्या व दर्जेदार शाळेमध्ये शिक्षण घेणे सुलभ झाले आहे. मुलींना एस.टी.महामंडळाकडून त्रैमासिक मोफत पास दिला जातो. एका मार्गावर किमान एका बसचे विद्यार्थी असल्यास त्या मार्गावर बसची फेरी सुरू करण्याचे सौजन्यही एस.टी.महामंडळाकडून दाखविले जाते. त्यामुळे शाळांमधील मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. ही योजना बारावीपर्यंतच्या मुलींसाठी लागू करावी, अशी मागणी होत होती. ‘अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना’ १२ वीपर्यंतच्या मुलींसाठी लागू करण्यात आली आहे. असंख्य मुलींना आपल्या गावात १२ वीपर्यंत शिक्षणाची सोय नसल्याने गावापासून दुसºया शाळेत शिक्षणासाठी जावे लागते. यासाठी मुली एस.टी.चा पास काढून किंवा आॅटोने महाविद्यालयात जात होत्या. पालकांचे ५०० ते ६०० किंवा त्याहून अधिक पैसे मुलीच्या प्रवासासाठी खर्च होत होते. आता राज्य शासनाच्या मोफत पास योजनेमुळे पालकांच्या खर्चाची बचत होणार आहे. हातात मोफत पास आल्याने विद्यार्थीनी हरखून गेल्या आहेत.सर्वच शाळांमध्ये मुलींचाच बोलबाला,मागील काही वर्षापासून राज्यातील बहुतांश शाळांमध्ये मुलींची संख्या मुलाच्या संख्येपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. यावरून मुलींच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाढ झाल्याचे स्पष्ट होते. तसेच गुणवत्तेमध्येही मुली मुलांना मागे टाकून आगेकुच करीत आहे. शळांमध्ये होणाऱ्या स्पर्धा, कार्यक्रम यामध्येही मुलांपेक्षा मुलीच पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.परंतु मुलांना मोफत पास मिळत नसल्याने मुलांची शाळेतील उपस्थिती घटत चालली आहे,
दररोज बस ऑटो आणि ईतर वाहनांची तिकीट काढायला पैसे कुठून येणार ? हा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भेडसावत आहे,त्यांच्या आईवडीलांची जेमतेम परिस्थिती आहे,जास्तीत जास्त विद्यार्थी नियमितपणे शाळेत आले तर त्यांचे भविष्य अंधकारमय होणार नाही,त्यांनाही महाराष्ट्र शासनाच्या राज्य परिवहन विभागाने 12 वि पर्यंत मोफत पास उपलब्ध करून द्यायला हवी,जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची जिद्द निर्माण होईल,