Home विदर्भ जप्तीची कारवाई टाळण्यासाठी सामान्य फंडातून दिला 3 लाख 13 हजार 838 रू.धनादेश...

जप्तीची कारवाई टाळण्यासाठी सामान्य फंडातून दिला 3 लाख 13 हजार 838 रू.धनादेश वडनेर येथील सरपंच व सचीव यांचा प्रताप

249

 

चौकशी करण्याची गुरुदयाल सिंग जुनी यांची उपजिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी 

:- प्रतिनिधी -प्रमोद झिले येरला

वर्धा –  हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथील ग्रामपंचायत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते सरपंचाचा हेकेखोरपणा असो की, सचीवाची मनमानी की,ग्राम पंचायतचा भ्रष्टाचार असे असून सूद्धा तिचे वार्षिक उलाढाल बक्कळ असताना ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी दोघांनी संगन मतांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासघात न घेता ठरावात न घेता त्यावर चर्चा न करता ग्रामपंचायत वर जप्तीची कारवाई टाळण्यासाठी 3,13,838 रू.धनादेश देवून जप्तीची कारवाई टाळण्यात आली जप्तीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी मंडळ अधिकारी श्याम चंदनखेडे यांना समोर करून जप्तीची कारवाई पूर्ण करण्याऐवजी व्यवहार करून ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी हरिदास रामटेके यांनी 3 लाख 13 हजार 838 रुपयाचा धनादेश दिल्याने जप्तीची कारवाई टळली ,सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांनी जनतेच्या पैशातील धनादेश देऊन स्वतःकेलेल्या, राजकीय सूडभावनेतून केलेले काम लपविण्यासाठी गोरगरीब जनतेचा पैसा वापरून एक प्रकारची फसवणूक केली आहे तरी शासनाने या विषयाकडे लक्ष देवून सरपंच व ग्राम विकास अधिकारी यांच्याकडून रक्कम वसूल करून शासनाने उच्चस्तरीय चौकशी करावी यासाठी हिंगणघाट वर्धा येथे निवेदन सादर करण्यात आले यावेळी ग्रा.पं सदस्य गूरूदयालसिंग जूनी,विनोद येळणे,हरिदास गायधने,दिपक शिवनकर उपस्थित होते.