Home यवतमाळ आचार्य डॉ. शिवमुनीजी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आचार्य डॉ. शिवमुनीजी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

168

 

यवतमाळ – वर्तमान आचार्य प. पु. डॉ. शिवमुनीजी महारासाब यांचा जन्मोत्सवानिमित्त तप महर्षी अक्षय ऋषीजी म. सा., मधुर व्याख्यानी अमृत ऋषीजी म. सा., नवदिक्षीत गितार्थ ऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यामध्ये दि. 17 सप्टेंबर रोजी ध्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले तर 18 सप्टेंबर रोजी सामाईक बेला तसेच सामुहिक एकासना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आचार्य शिवमुनीजी म. सा. यांच्या जन्मोत्सवा निमित्त स्वाधायीय बहन कु. तृप्ती नंदकुमार बोरा हिने 11 उपवासाचे संकल्प घेतले असून आज दि. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 7 प्रार्थना व सकाळी 8.30 ते 9.30 प्रवचन तसेच सामायीक स्वाध्यायचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमात सकल जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जैन सेवा समितीचे अध्यक्ष रमेश खिवसरा, चतुर्मास समिती अध्यक्ष अमर गुगलीया व महामंत्री श्याम भंसाली यांनी केले आहे.