
डॉक्टरांचा प्रताप अनेक लोकांना दिले जनावरांचे इंजेक्शन ,
तरुणांनी डॉक्टरला दिले पोलिसांच्या ताब्यात ,
अमीन शाह
बोगस डॉक्टरने जवळपास 40 हून अधिक लोकांना जनावरांची इंजेक्शन दिल्याचं समोर आलं . डॉक्टर असल्याचे सांगत एका व्यक्तीने गेल्या दोन दिवसापासून माणसांना जनावरांचे औषध वापरून इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे . अहमदनगर मधील पाथर्डी तालुक्यातील खंडोबावाडी येथे हा प्रकार घडला आहे . या बोगस डॉक्टराने जवळपास 40 हून अधिक महिला आणि पुरूषांना इंजेक्शन दिल्याचं स्पष्ट झालं आहे . राजेंद्र जवंजळे असं या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत . या बोगस डॉक्टरला गावातील काही जागरूक तरूणांनी पकडले आणि त्याला तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर बाबासाहेब होडशीळ यांच्या ताब्यात दिले . त्यानंतर या बोगस डॉक्टरवर पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तिसगाव येथे या बोगस डॉक्टराच्या बॅगेतील औषधांची खातरजमा झाल्यानंतर त्याला पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं . करंजी जवळील खंडोबावाडी येथे गेल्या दोन दिवसापासून राजेंद्र जवंजळे हा डॉक्टर म्हणून आला होता . त्याने तिथल्या काही व्यक्तींना मान , कम्बर ,गुडघा आणि पाठदुखीवर उपचार करत त्यावर इंजेक्शन दिले . ज्या ठिकाणी दुखत आहे त्याच ठिकाणी इंजेक्शन देऊन प्रत्येकाकडून पाचशे रुपये उकळले . गेल्या दोन दिवसापासून हा बोगस डॉक्टर या गावातील लोकांना इंजेक्शन टोचण्याचे काम करत होता अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे . गावातील काही तरुणांनी या डॉक्टरच्या बॅगेतील इंजेक्शनच्या बाटल्या तपासल्या असता त्या बाटल्यावर जनावरांची चिन्हं आढळून आली त्या नंतर गावातील काही तरुणांनी या बोगस डॉक्टर ला पकडून पोलिसांच्या हवाली केले सध्या पालिस या बोगस डॉक्टर चा तपास करीत असून या पूर्वी ही या बोगस डॉक्टर ने किती लोकांना लस टोचली याचा तपास करीत असून ही लस घेतलेल्या लोकांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभाग कडून करण्यात आले आहेत ,











































