Home महत्वाची बातमी नाल्याच्या पुरातून अंत्यसंस्कारासाठी नेले प्रेत…!

नाल्याच्या पुरातून अंत्यसंस्कारासाठी नेले प्रेत…!

883

 

माळकिन्हीं येथील गंभीर प्रकार,स्मशानभुमीत जाण्यासाठी रस्ता,पुल नसल्याने नागरिकांना त्रास

सरपंच

यवतमाळ / हरीश कामारकर
स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाईकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नाल्याच्या पुरातून वाट काढावी लागत असल्याचा संताप जनक प्रकार महागाव तालुक्यातील माळ किन्ही येथे घडला आहे.
महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथील अविनाश कलाने(वय४०वर्षे) यांचा उपचारा दरम्यान दिनांक ५सप्टेंबर२०२२रोजी शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला.नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणला असता दिवसभर धुवाधार पाऊस पडत होता अशातच अंत्यसंस्कार करण्यासाठी इतरत्र जागा नसल्याने नाल्याच्या पैलतीरावर असलेल्या दहनशेड मध्ये अंत्यसंस्कार करण्याचे नातेवाईकांनी ठरविले परंतु पाऊस थांबता थांबेना व नाल्याला जोरदार पुर होता व नाल्याच्या पैलतीरावर जाण्यासाठी रस्ता किंवा पुल नसल्याने व अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ होत असल्याने नातेवाईकांनी मृतदेह तिरडीवर बांधुन तिरडी खांद्यावर घेवुन एकमेकांच्या सहाय्याने छातीपर्यंत पाणी असलेल्या नाल्याच्या पुरातून वाट काढीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.यागंभीर घटनेमुळे प्रशासनाचा व लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. माळकिन्ही हे गाव हिंगोली लोकसभा व उमरखेड विधानसभा क्षेत्रात येत असुन खा.हेमंत पाटील व आ.नामदेवराव ससाणे या दोन्ही लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसुन येत असुन ते सत्तेच्या खेळात मश्गुल असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अनिल खंडारे

####चौकट###
माळकिन्ही गावची लोकसंख्या ४हजार असुन सर्वसामाजाचे नागरिक गावात राहतात या ठिकाणी स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने प्रशासनाने स्मशानभुमीसाठी जागा व दहनशेड उपलब्ध करून द्यावे याकरिता माळकिन्ही ग्रामपंचायतच्यावतीने प्रशासन,आमदार नामदेवराव ससाणे यांच्याकडे केली असुन जिल्हा प्रशासन व आमदार साहेब याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नसल्याने स्मशानभूमी अभावी नागरिकांची वाताहत होत आहे.
– सौ.शितल संजय लहाने
सरपंच माळकिन्ही

####चौकट####
स्वातंत्र्याच्या ७५वर्षांनंतरही माळकिन्ही गावाला स्मशानभुमी उपलब्ध होवु शकली नाही हे याविभागाचे आतापर्यंत झालेले,आमदार,खासदार,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचे अपयश असुन आजही पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे हा प्रश्न गावकऱ्यांसमोर कायम उभा आहे.
:- अनिल खंदारे(नागरिक)