Home यवतमाळ अँड. निलय नाईकांना मंत्रीमंडळात घेतल्यास, “बंगल्या” पुढे निर्माण होऊ शकते तगडं आव्हान.

अँड. निलय नाईकांना मंत्रीमंडळात घेतल्यास, “बंगल्या” पुढे निर्माण होऊ शकते तगडं आव्हान.

822

 

आमदार निलय नाईकांना मंत्रिमंडळात घेण्याची समर्थकांकडून मागणी…!

यवतमाळ / हरीश कामारकर
राज्याच्या जडणघणीत बंजारा समाजाचे मोठे योगदान असुन ज्यावेळी दुष्काळ व भुक बळी सारखें मोठे संकट महाराष्ट्रावर आले असता, यात या समाजातील नेते वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी राज्याचे नेतृत्व आपल्या खांद्यावर घेउन या संकटांना धीराने तोंड दिले व या संकटांचा निपटारा केला होता. मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात वसंतराव नाईकानी राज्यात हरित क्रांती घडवून कृषि क्षेत्रात समृध्दी आणली. तर सिंचनाच्या माध्यमातून सुधाकरराव नाईकांनी मोठ्या प्रमाणात धरणे बांधून राज्याचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडविला. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असताना, यामुळे पाणीटंचाईचा झळा या भागाला सोसाव्या लागत होत्या. मात्र सुधाकरराव नाईक यांनी केलेल्या विविध प्रयोगाने दरम्यान पावसाळ्यात जोरदार पाऊस विदर्भ आणि मराठवाड्यात झाला होता. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी, पावसाळ्याचा पहिला पाऊस पडला की मुख्यमंत्री बंगल्यावर पेढे वाटून त्या पावसाचे स्वागत करन्यात आले होते. बंजारा समाजाने राज्याला दोन-दोन मुख्यमंत्री तर मनोहरराव नाईकाच्या रूपाने आघाडीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाचे कॅबिनेट मंत्री दिले. यामुळें या समाजाचे राज्याच्या आजवरच्या जडणघडणीत मोठे योगदान मानले जाते. वसंतराव नाईक व त्यांचा राजकीय प्रवास मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय तसेच शेती आणि शेतकरी हे त्यांचे जिव्हाळ्याचे नव्हे तर अभ्यासाचे विषय होते.त्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वयंपूर्ण केले. कापूस एकाधिकरण योजना अशा अनेक योजना राबविल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात धवल क्रांती घडवून आणली.शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात चार-चार कृषी विद्यापीठे स्थापना केली,१९७२ च्या दुष्काळात शेतकऱ्यांना,शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून देणारी त्यांची ऐतिहासिक रोजगार हमी योजना आजही देश पातळीवर चालू आहे. त्याच सोबत दुसरे मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक यांनी पण या राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम कसे होतील या दृष्टीने राज्यांमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राज्यपातळीवर राबवून शेतकरी ना मुबलक पाणी देऊन शेतकऱ्यांची शेतीची तहान भागविली. यामुळें या घराण्याला मानणारा मोठा वर्ग राज्यात पहावयास मिळतो.
याचं बरोबर काँग्रेस – राष्ट्रवादीच्या सरकार मध्ये मनोहराव नाईक यांनी सलग दहा वर्ष मंत्रिपद भूषवून राज्याच्या राजकारणात घराण्याचे महत्त्व टिकवून ठेवलं तर पुसद उपविभागांमध्ये आपला दबदबा कायम ठेवला. या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेसह सहकार क्षेत्रात मनोहरराव नाईकानी आपलं वर्चस्व नेहमी कायम ठेवलं. परंतु वयोमानानुसार व तब्येतीतील अस्थिरता या कारणाने २०१९ च्या विधानसभा रिंगणात आपले कनिष्ठ पुत्र इंद्रनिल नाईकांना उतरून त्यांनी आपल्या बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादीचा झेंडा कायम ठेवला तर पुसद येथील नगरपालिकेत पत्नी सौ.अनिता नाईक यांच्या रूपाने आपला नगराध्यक्ष अबाधित ठेवण्यास नाईकांना नेहमीचं यश आलं यामुळे मनोहर नाईकांना “अजातशत्रू” म्हणूनही संबोधण्यात येते.
विधानसभेच्या रिंगणात भाजप व इतर पक्षांना मनोहर नाईकांना शह देता येतं नसल्याने अँड. निलय नाईक यांना भाजपने विधान परिषदेवर घेऊन घराण्याच्या राजकारणात एन्ट्री करुन एक वेगळी खेळी खेळली होती. आता याच आमदार अँड.निलय नाईकांना मंत्रिमंडळात घेण्याची मागणी अँड. निलय नाईक समर्थक करीत आहेत.

राज्यात नुकतेच सत्तांतर झाले असून महाविकास आघाडीकडे असलेल्या सत्तेच्या चाव्या आता शिंदे गटाच्या साथीने भाजपकडे आलेले आहेत. याच मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटमध्ये नाईक घराण्यातील विद्यमान भाजप आमदार तथा यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आमदार अँड. निलय नाईक यांना सहभागी करून घ्यावी असा मानस बंजारा समाजाकडून व्यक्त होत आहे. याच मागणीला घेऊन महागाव तालुक्यातील बंजारा पॅंथरचे अध्यक्ष रोहिदास पवार आपल्या शिष्टमंडळासह आगामी ८ सप्टेंबर रोजी भाजपा नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पुढील होणाऱ्या विस्तारात अँड.निलय नाईक यांना मंत्रीपद देऊन त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग करून घ्यावा अशी मागणी करणार करणार असल्याची माहिती एका पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

*बंजारा समाजाला दुसर मंत्री पद मिळणार का.?*
महाविकास आघाडीच्या काळात वनमंत्री असलेल्या संजय राठोड यांना एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी मंत्री पदाचा राजीनामा घेऊन पदावरून दूर करण्यात आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरात सत्तेच्या चाव्या पुन्हा भाजपकडे आल्या, व राज्यात नव सरकार अस्तित्वात आलं. याच नव्या सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार पार पडला असून यात बंजारा समाजाचे नेते असलेले माजी मंत्री संजय राठोड यांना अन्न औषध प्रशासनाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. यातच आता नाईक घराण्यातून भाजपवासी असलेले आमदार निलय नाईक यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे आगामी होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राठोडांसोबतच यवतमाळ जिल्ह्यातून निलय नाईक यांना मंत्रीपदाचा लाल दिवा देऊन बंजारा समाजासमोर “बंगल्याला” समर्थ पर्याय देईल का, जर असे झाल्यास पुसद विभागात दबदबा असलेल्या “बंगल्या” समोर एक तगडं आव्हान भाजप निर्माण करु शकेल का.? हे पाहणे औस्तुक्याचे ठरेल…