Home यवतमाळ अंजुमन शाळेत 15 अगस्त निमित्य “स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव” मोठ्या उत्साहात...

अंजुमन शाळेत 15 अगस्त निमित्य “स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव” मोठ्या उत्साहात साजरा.

243

 

यवतमाळ :- दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्थानिय अंजुमन उर्दू हायस्कूल यवतमाळ मध्ये स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष जाफ़र सादिक गिलानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

त्यांच्या सोबत संस्थाचे सदस्य मोहम्मद शोएब शिवानी व आसिफ गिलानी प्रमुख्यने उपस्थित होते.सदर कार्यक्रमा मध्ये अंजुमन इंग्लिश मीडियम स्कूल, प्रायमरी स्कूल आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी देश भगती गीत, समूहगीत, नाटक, भाषणे सदर करून सर्व श्रोत्यांची मने जिंकली.मुसळधार पाऊस असूनही विद्यार्थ्यांचा उत्साह कमी झाला नाही. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचे संचालन मदिहा अमरीन आणि तंज़ीमा इस्नैन या विद्यार्थिनींनी केले, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद देत कार्यक्रम शांततेत यशस्वी केला.कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही उत्साह दाखवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजुमन उर्दू हायस्कूल यवतमाळचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.