Home यवतमाळ सेवानिवृत्त उपअभियंता श्री रमेशराव जिरापुरे यांचे निधन

सेवानिवृत्त उपअभियंता श्री रमेशराव जिरापुरे यांचे निधन

210

 

यवतमाळ : पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता श्री रमेशराव पांडुरंगजी जिरापुरे यांचे रविवारी 10 जुलै 2022 ला नाशिक येथे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते. येथील तेली समाजाची शिखर संस्था असलेल्या संताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष श्री सुरेशकाका जिरापुरे यांचे ते धाकटे बंधू होते. त्यांचे पश्चात पत्नी अनुपमा, मुलगी रीना शास्तारे, पुणे, मुलगा सुजित जिरापुरे नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर नाशिक येथील मोक्षभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.