Home यवतमाळ पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैनगंगा नदीच्या पात्रात महिलेचे प्रेत आढळले.

पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैनगंगा नदीच्या पात्रात महिलेचे प्रेत आढळले.

269

 

( अयनुद्दीन सोलंकी )
घाटंजी : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी पैनगंगा नदीच्या पात्रात एका स्रीचे प्रेत (डेड बॉडी) वय 25 ते 35 वर्ष असलेली एका स्त्री चे प्रेत आढळले.


सदर स्त्री घ्या अंगात चॉकलेटी रंगाचे परकर, चॉकलेटी रंगाचा ब्लाऊज असुन, ऊजवे हाताचे कांबीवर (अशोक.राजू.राठोड) असे गोंधुन असलेले प्रेत आढळल्याने सदर प्रेत पुरात वाहुन आले असल्याची शंका पारवा पोलीसांनी व्यक्त केली आहे. तसेच प्रेताच्या डावे हातात काळे रंगाचा धागा असून, पिवळ्या धातूची एक बांगडी आहे. सदर महिलेची ओळख पटविने कामी कृपया सहकार्य करावे, असे आवाहन पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण (जि. यवतमाळ) यांनी नागरिकांना केले असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9011090975 असा आहे.