Home बुलडाणा बापाने आईचा खून केला अन , जेलात गेला आता मुलीची ही आत्महत्या...

बापाने आईचा खून केला अन , जेलात गेला आता मुलीची ही आत्महत्या ,

618

 

हनिफ शेख ,

अंढेरा ता , देऊळगावराजा

तीन महिन्यांपूर्वी तिच्या बापाने तिच्या आईच्या डोक्यात पाटा घालून खून केला. वडील जेलात, आई देवाघरी अशी स्थिती असल्याने ती मामाच्या घरी अंत्री खेडेकर येथे राहत होती. दरम्यान काल, ६ जुलै रोजी तिने गावातीलच एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिने विहिरीत उडी टाकल्यावर तिथे उपस्थित काही युवकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र ती कपारात अडकल्याने तिला वाचवता आलेच नाही. लक्ष्मी उर्फ स्वाती संजय गवई (१८) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार साखरखेर्डा येथील मृतुक लक्ष्मी गवई च्या वडिलांनी तीन महिन्याआधी लक्ष्मीच्या आईचा खून केला होता. त्यामुळे लक्ष्मीचे वडील सध्या जेल मध्ये आहेत. लक्ष्मी तिच्या दोन भावांसह मामाची गावी अंत्री खेडेकर येथे राहत होती. दरम्यान काल, सकाळी तिची आजी घरात स्वयंपाक करत होती. त्यावेळी काही क्षुल्लक कारणावरून लक्ष्मीला राग आल्याने ती घराबाहेर गेली. तिच्या पाठीमागे मुले तिला पकडण्यासाठी धावले. .मात्र ती धावत धावत गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात असलेल्या विहिरीवर गेली.उडी मारणारा तेवढ्यात मुलांनी तिला पकडले सुद्धा. मात्र तिने रागात मुलांना झटका देऊन विहिरीत उडी घेतली.तिला वाचवण्यासाठी मुलांनी सुद्धा लगेच विहिरीत उड्या घेतल्या. मुलांनी बराच वेळ पाण्यात तिचा शोध घेतला मात्र ती कपारात अडकल्याने लवकर सापडू शकली नाही. त्यामुळे तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. अंढेरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून लक्ष्मीच्या आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करीत आहेत.