
अमित राज ठाकरे नावच वादळ लवकरच विदर्भात धडकणार….चेतन पेडणेकर.प्रमुख संघटक मनविसे.

विदर्भातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्या केंद्रस्थानी ठेऊन मनविसे युवकांना न्याय देणार…. संतोष गांगुर्डे…. प्रमुख संघटक मनविसे

युवा हृदय सम्राट मा.श्री.अमितसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची सुत्र हाती घेतल्यानंतर नव्या जोमाने कार्यकर्त्यात उत्साह संचारला असुन युवकांचे प्रश्न व त्यांना भेडसावणार्या समस्या जाणुन घेण्यासाठी तसेच विदर्भातील मनविसेची पक्षबांधणी व संघटनात्मक बांधणी यासाठी अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये मनविसेचे प्रमुख संघटक चेतनभाऊ पेडणेकर व प्रमुख संघटक संतोषभाऊ गांगुर्डे हे पश्चिम विदर्भाच्या दौर्यावर असुन त्या अनुषंगाणे दि. २७ जुन २०२२ रोजी स्थानिक टिळक स्मारक येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याच्या आयोजन करण्यात आले होते.लवकरच अमित राजसाहेब ठाकरे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य युवकांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी व मनविसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असून त्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमुख संघटक चेतन पेडणेकर, प्रमुख संघटक संतोष गांगुर्डे यांनी मागदर्शन करतांना विद्यार्थ्यांच्या समस्या प्रश्न समजून घेऊन त्यावर विद्यार्थ्यांना न्याय द्यावा सोबतच संघटनात्मक बांधणीवर भर देत जिल्यात मनविसे विद्यार्थ्यांसाठी एकमेव पर्याय म्हणून समोर यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी लवकरच अमित राजसाहेब ठाकरे विदर्भाच्या युवकांचे प्रश्न समस्या जाणून घेण्यासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती या प्रसंगी दिली. सोबतच मनविसे च्या जिल्ह्यातील कार्याचे कौतुक करत सर्व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती राज्यउपाध्यक्ष आनंदभाऊ यंबडवार व देवा शिवरामवार जिल्हाध्यक्ष मनसे यांची होती.प्रास्ताविकपर बोलतांना अनिल हमदापुरे यांनी मनविसेने केलेल्या उपक्रमांची, आंदोलनांची माहिती देत पक्ष स्थापने पासूनचा प्रवास मांडला.
या मेळाव्यात मनसेत नव्याने काम करु इच्छीणार्या युवकांना ही सुवर्णसंधी असुन या मेळाव्यात यवतमाळ जिल्ह्यातील अनेक युवकांनी मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसेत प्रवेश केला.. सदर मेळाव्यास जिल्ह्यातील मनसे, मनविसे व इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्या नंतर स्थानिक विश्राम गृहावर मनविसेच्या जिल्ह्यातील पदाधिकार्यांची बैठक प्रमुख संघटकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मेळाव्यात मोठ्या संख्येने युवक, युवती सहभागी झाले होते.











































