Home जळगाव भुसावळ येथे दावते इस्लामी हिंद चा वती ने हज यात्रा प्रशिक्षण शिबीर...

भुसावळ येथे दावते इस्लामी हिंद चा वती ने हज यात्रा प्रशिक्षण शिबीर (कॅम्प) संपन्न

254

रावेर (शेख शरीफ)
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे दर वर्षी हज यात्रेसाठी लाखो मुस्लिम बांधव सऊदी अर्बियातील पवित्र शहर मक्का मदिना येथे जातात या भाविकांना आपली हज यात्रा व धार्मिक विधी शास्त्रोक्त पध्दतीने करता यावीत या उद्देशाने मार्ग दर्शन महणून हज प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जातात‌.

दावते इस्लामी हिंद हि भुसावळ शहरात सतत १७ वर्षां पासुन जिल्हास्तरीय हज प्रशिक्षण शिबिराचा आयोजन करीत आहे यंदा हि दिनांक ५ जून रविवार रोजी ज्युनिअर रेल्वे इन्स्टिट्यूट येथे एक दिवसीय हज प्रशिक्षण शिबिर( कॅम्प) चे आयोजन सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले सदरहू प्रशिक्षण शिबिरात जिल्हाभरातून भाविकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावुन लाभ घेतले.या वेळी मार्गदर्शक म्हणून हाफीज़ फारुक धुळे, मोईन अत्तारी अकोला यांनी भाविकांना हज मध्ये अदा करण्यात येणारी धार्मिक विधी व दर्शन सहित इत्यादी सर्व विधी कशा पुर्ण कराव्यात या साठी सखोल मार्गदर्शन व माहिती दिली . कार्यक्रमाच्या शेवटी विश्वशांती व भारत देशा च्या सर्वांगीण उन्नती प्रगती व एकोपा साठी प्रार्थना हि करण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी शाकीर, हाजी तन्वीर, रफीक कादरी ,शफीक अत्तारी , युसूफ खान, अशफाक शेख , मोहसिन शेख ,आसिफ अत्तारी, व रफिक रोशन यांनी खुप परिश्रम घेतले.