Home विदर्भ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ निमित्त राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे “बिटुमिनस कॉंक्रिटच्या...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ निमित्त राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड द्वारे “बिटुमिनस कॉंक्रिटच्या सर्वात लांब,अखंड रस्त्याची अखंडपणे निर्मिती”

292

शुक्रवार, ३ जून २०२२ रोजी वरील श्रेणीअंतर्गत माना कॅम्प, अमरावती, छ. १९३+१००, तहसील – मूर्तिजापूर, जिल्हा – अकोला, महाराष्ट्र येथे ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्यासाठी आम्ही गौरवशाली प्रयत्न करणार आहोत.

राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या, पॅकेज – l मध्ये,अमरावती-चिखली विभागात, लोणी गावाजवळ, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करण्यासाठी सज्ज आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करण्याचा प्रयत्न शुक्रवार, ३ जून २०२२ रोजी सकाळी ६:०० वाजता सुरू होईल आणि मंगळवार, ७ जून २०२२ पर्यंत अखंड सुरू राहील.

या प्रतिष्ठित विक्रमाच्या प्रयत्नाचे साक्षीदार होण्यासाठी व अमरावती आणि अकोला जिल्ह्याला जगाच्या नकाशावर आणण्यासाठी,आपल्या प्रतिष्ठित माध्यम संस्थेचे सहकार्य अपेक्षित आहे. तरी कृपया आपण महाराष्ट्रातील या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी,आपल्या माध्यम संस्थेचे पत्रकार, छायाचित्रकार व व्हिडिओग्राफर यांना पाठवून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, ही विनंती आहे.